इकडं यासिन मलिक दोषी तिकडं शाहिद आफ्रिदीच्या पोटात दुखलं |Yasin Malik Shahid Afridi Terror Funding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid Afridi

इकडं यासिन मलिक दोषी तिकडं शाहिद आफ्रिदीच्या पोटात दुखलं

नवी दिल्ली : एनआयए (NIA) कोर्टाने आज जम्मू काश्मीरचा फुटीतरतावादी नेता यासिन मलिकला (Yasin Malik) टेरर फंडिंग केल्याप्रकणी दोषी ठवले. त्याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र या निर्णयामुळे तिकडे पाकिस्तानातील (Pakistan) अनेक सेलिब्रेटिंच्या पोटात दुखू लागले आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) याबाबत ट्विट करून नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: यासिन मलिकला फाशी की जन्मठेप? थोड्याच वेळात होणार फैसला

लिबरेशन फ्रन्टचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकला टेरर फंडिग प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. यावर आज एनआयए कोर्टात निकाल राखून ठेवला आहे. त्याला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास पथकाच्या (NIA) विशेष कोर्टानं १९ मे रोजी यासिन मलिक याला बेकायदा कारवाया प्रतिबध कायद्यांतर्गत (UAPA) सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पटियाला हाऊस कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंच्या धमकीनंतर अफझलखानच्या कबर परिसरात मोठा बंदोबस्त

दरम्यान, एनआयए कोर्टाने त्याला दोषी ठरवताच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ट्विट केले. शाहिद आफ्रिदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'भारतात सुरू असलेल्या मानवी अधिकारांचे दमन विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम सातत्याने सुरू आहे. यासिन मलिकविरूद्ध खोटे आरोप लावून काश्मीरचा स्वातंत्र्याबद्दलचा संघर्ष थांबणार नाही. मी विनंती करतो की युएनने काश्मिरी नेत्यांविरूद्ध सुरू असलेल्या खोट्या अन्यायकारक कायदेशील खटल्यांची दखल घ्यावी.'

Web Title: Yasin Malik Guilty In Ani Court For Terror Funding Shahid Afridi Tweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top