esakal | याला म्हणतात नशीब!, बागेत फिरायला गेली, तिथं सापडला महागडा हिरा
sakal

बोलून बातमी शोधा

याला म्हणतात नशीब!, बागेत फिरायला गेली, तिथं सापडला महागडा हिरा

याला म्हणतात नशीब!, बागेत फिरायला गेली, तिथं सापडला महागडा हिरा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बागेमध्ये फिरताना हिरा सापडला असं कधी ऐकलं आहे का, असं प्रत्यक्षात घडलं तर, सध्या सोशल मीडियावर त्या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. कॅलिफोर्नियामध्ये जे घडलं त्यामुळे देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के, असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय एका महिलेला आला. तिला अर्कांसस स्टेट पार्कमध्ये फिरताना 4.38 कॅरेटचा एक दुर्मिळ हिरा सापडला. ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्या महिलेचे नशीब जोरावर असल्यानं तिला तो हिरा सापडला. यासंबंधीची अधिक माहिती युएस टूडेनं दिली आहे. क्रेटर ऑफ डायमंड्समधील स्टेट पार्कमध्ये फिरणाऱ्या नोरेन वेडबर्गला हिरा सापडला.

नोरेनला पहिल्यांदा आपण काय पाहतो आहोत, आपल्याला काय मिळाले आहे यावर तिचा विश्वासच बसला नाही. तिला माहितीही नव्हतं, आपल्या हाती किती मोठी वस्तू लागली आहे. तिनं सांगितलं, मी तो पिवळ्या रंगाचा दगड हातात घेतला त्याचे कारण मला तो अधिक स्वच्छ वाटला. त्याची किंमत अडीच ते वीस हजार डॉलर एवढी असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अर्थात हा सगळा खेळ त्या महिलेच्या नशीबाचा नाही. त्यात काही भाग त्या पार्कचा देखील आहे. Arkansas State Park हे असं पार्क आहे की ज्यामध्ये अनेक लोकं हिऱ्याचा शोध घेण्यासाठी येतात. मात्र त्यांना तो मिळतोच असे नाही. हिऱ्याऐवजी त्याठिकाणी वेगवेगळ्या महागडे खडेही मिळाल्याची उदाहरणं आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना त्या पार्कमधील प्रशासनानं सांगितलं की, त्या महिलेला मिळालेला तो आतापर्यतचा सर्वात मोठा हिरा आहे. 1972 मध्ये त्या क्रेटर ऑफ डायमंड्सची निर्मीती करण्यात आली होती. आता ते एक सरकारी पार्क झाले आहे. आतापर्यत तिथे 75 हजार हिरे सापडले आहेत. रिपोर्टनुसार यावर्षी तिथे 258 हिरे सापडले आहेत. त्या पार्कमध्ये येणाऱ्या व्यक्तींना एक दोन हिरे तर मिळतातच. असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: भाजपशी संबधित 'ते' दोघे अधिकारी? नवाब मलिकांनी NCBला केला सवाल

हेही वाचा: क्रुझवर काहीच मिळाले नाही, NCBची कारवाई खोटी, नवाब मलिकांचा दावा

loading image
go to top