
थोडक्यात
येमेनच्या किनाऱ्याजवळ स्थलांतरितांची बोट उलटून ६८ आफ्रिकन नागरिकांचा मृत्यू झाला, तर ७४ जण बेपत्ता आहेत.
१५४ इथिओपियन स्थलांतरितांनी भरलेली ही बोट एडनच्या आखातात उलटली; केवळ १२ जणांना वाचवण्यात यश आले.
अफ्रिकन स्थलांतरित कमी खर्चात आखाती देशांत जाण्याचा प्रयत्न करत असताना समुद्रमार्ग जीवघेणा ठरत आहे.
Yemen Boat Tragedy : येमेनच्या किनाऱ्याजवळ स्थलांतरितांनी भरलेली बोट उलटल्याचे वृत्त आहे. या अपघातात ६८ आफ्रिकन स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर ७४ लोक अजूनही बेपत्ता आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी येमेनच्या किनारी पाण्यात हा अपघात झाला. माहितीनुसार या बोटीवर १५४ लोक होते.