'एकही कोरोना रुग्ण सापडला नाही'; उत्तर कोरियाची WHO ला माहिती

kim jong un
kim jong un

नवी दिल्ली : उत्तर कोरिया हा देश नेहमी चर्चेत असतो. तो यासाठी चर्चेत असतो कारण तिथल्या हुकूमशाहीच्या चर्चा जगाला अंचब्यात पाडतात. तिथला हुकूमशहा किम जोंग उन आणि त्याचे निर्णय नेहमीच चर्चेचा विषय असतात. अत्यंत कडवट अशी हुकूमशाही राजवट म्हणून उत्तर कोरियाला ओळखलं जातं. कोरोनाच्या काळात किम जोंग उनने या देशाचा कारभार कसा हाताळला असेल, याची उत्सुकता बऱ्याच जणांना असणार आहे. या देशातील कोरोना परिस्थिती देखील अशीच धक्कादायक आहे. उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटनेला दिलेल्या माहितीनुसार, 10 जूननंतर देशातील 30 हजार लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, तिथे अद्याप एकही कोरोना रुग्ण सापडला नाहीये.

kim jong un
भूक लागलेला हत्ती पोहोचला थेट किचनमध्ये; VIDEO VIRAL

आरोग्य संघटनेने आज मंगळवारी एका देखरेखीच्या अहवालात म्हटले आहे की उत्तर कोरियाच्या चाचण्यांच्या आकडेवारीत 4-10 जून दरम्यान 733 लोकांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 149 लोक तीव्र श्वसन संक्रमण संसर्गामुळे इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त आहेत. उत्तर कोरियाचा हा दावा आहे की, कोरोना विषाणूचा एकही संसर्ग देशात नाही. तज्ज्ञांना या दाव्याबाबत दाट संशय आहे.

kim jong un
जेट एअरवेज पुन्हा उडणार; NCLT कडून रिझॉल्यूशन प्लॅनला मंजूरी

विषाणू विरोधातील या प्रयत्नांचे वर्णन "राष्ट्रीय अस्तित्वाची बाब" म्हणून केले गेले आहे. उत्तर कोरियाने पर्यटकांवर बंदी घातली आहे, मुत्सद्दी लोकांना बाहेर काढले आहे आणि सीमावर्ती रहदारी व व्यापारावर कठोरपणे बंदी घातली आहे. स्वत:वर लादलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर आधीच ताण पडला आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी गेल्या आठवड्यात एका राजकीय परिषदेदरम्यान अधिका-यांना दीर्घकाळापर्यंत कोरोना निर्बंधासाठी कटाक्षाने बोलण्याची मागणी केली होती. यावरून असं सूचित होतं की उत्तर कोरिया लवकरच आपल्या सीमारेषा उघडण्यास अद्याप तयार नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com