
सोशल मीडियांनी ट्रम्प यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नवी दिल्ली- फेसबुक आणि ट्विटरनंतर आता यूट्यूबने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक आठवड्यासाठी बॅन लावला आहे. ऑनलाईन आणि व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या या बंदीमागे हिंसा पसरण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यूट्यूबने एक आठवड्यांची बंदी घालत म्हटलंय की, त्यांच्या कोणत्याही पोस्टमुळे हिंसा भडकू शकते. सोशल मीडियांनी ट्रम्प यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कृषी कायद्यांना स्थगिती, समितीची स्थापना; शरद पवार म्हणतात, हा निर्णय म्हणजे...
20 जानेवारीला अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन पदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर यूट्यूबने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोणत्याही वक्तव्यामुळे हिंसा भडकू शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून सोशल मीडिया कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मागील आठवड्यात ट्विटरने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. याशिवाय फेसबुक आणि इन्स्टाग्रामने ट्रम्प यांच्यावर 20 जानेवारीपर्यंत बंदी आणली आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी म्हटलं होतं की, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती ज्यो बायडेन यांचा शपथविधी होत नाही, तोपर्यंच डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट बंद ठेवले जाईल. त्यामुळे ट्रम्प यांना फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरता येणार नाही.
विद्यापीठाची सत्र परीक्षा 24 जानेवारीपासून ! शेवटचा पेपर 8 फेब्रुवारीला
20 जानेवारीला अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खबरदारी घेताना दिसत आहेत. फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट निलंबित केले आहे. ट्रम्प यांना समर्थन देणाऱ्या उजव्या संघटनांविरोधातही सोशल मीडिया कंपन्या कठोर पाऊल उचलताना दिसत आहे.
अमेरिकेत गेल्या बुधवारी इलेक्टोरल मतांच्या मोजणीवेळी हिंसाचार झाला होता. यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्यात. मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने त्यांचे खाते सस्पेंड केले. ट्रम्प यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी सातत्यानं ट्विटरचा वापर केला. त्यांच्या चिथावणीखोर आणि खोट्या वक्तव्यांमुळे ट्विटरने त्यांचं खातं सस्पेंड केलं. हा निर्णय घेण्यात भारतीय वंशाची विजया गड्डे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.