Video: भीषण अपघातात ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे...

वृत्तसंस्था
Monday, 3 August 2020

इंदूर-इच्छापूर महामार्गावर झालेल्या एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातात एका ट्रॅक्टरचे दोन तुकडे झालेले पाहायला मिळतात. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी आहेत.

इंदूर (मध्य प्रदेश): इंदूर-इच्छापूर महामार्गावर झालेल्या एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातात एका ट्रॅक्टरचे दोन तुकडे झालेले पाहायला मिळतात. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी आहेत.

Video: अपघाताच्या व्हिडिओवर विश्वासच बसत नाही...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, छायगाव माखन येथून एक ट्रक वेगाने बुरहानकडे जात होता. ट्रकचालक वेगाने चालवत असल्यामुळे त्याच्या पाठीमागे असलेल्या युवकांनी पुढे जाऊन पोलिसांना माहिती देऊ या विचारात व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. पण, काही वेळातच ट्रक जोरात जाऊन एका ट्रॅक्टरवर जाऊन जोरात आदळला. यामध्ये ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले तर ट्रॅक्टरच्या पाठीमागे असलेल्या दुचाकी चालक जोरात येऊन आदळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोघेजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, छागाव मकन पोलिस अपघातानंतर घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी करत आहेत. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चॅलेंज! फोटोमध्ये कुत्र्याला शोधून दाखवाच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truck tractor accident at indore video viral