
सेक्सबाबत उपयुक्त अशी माहिती समजण्यासाठी तरुणांना पॉर्नची मदत होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. पण त्यात एक वाईट गोष्ट अशीही समोर आली आहे.
बोस्टन - पॉर्नोग्राफीमुळे तरुणांच्या सेक्सबाबतच्या मतांवर होणारा परिणाम याबबात एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये सेक्सबाबत उपयुक्त अशी माहिती समजण्यासाठी तरुणांना पॉर्नची मदत होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. पण त्यात एक वाईट गोष्ट अशीही समोर आली आहे. पॉर्न कशासाठी असतं याबाबत तरुणांमध्ये गैरसमज आहेत. अनेक फ्री आणि ऑनलाइन पॉर्नोग्राफी साइट आहेत त्यावर केवळं मनोरंजन आणि पैसा मिळवणं हाच उद्देशानं साहित्य अपलोड केलेलं असतं असं मत अभ्यास करणाऱ्या इमिली रॉथमॅन यांनी सांगितलं.
इमिली बोस्टन विद्यापिठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सेक्स कसं काय करायचं हे शिकवण्यासाठी पॉर्न नाही असही रॉथमॅन यांनी सांगितलं. 'Archives of Sexual Behavior' या जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित झालं आहे. संशोधकांनी यांमध्ये 18 ते 24 वयाच्या 257 तरुणांना तर 14 ते 17 वयोगटातील 324 जणांना काही प्रश्न विचारले होते. त्यांनी पॉर्नमधून सेक्सबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याचं म्हटलं.
हे वाचा - शिकागोत सिरियल किलिंगचा हाहाकार; सनकी व्यक्तीकडून तिघांचा खात्मा तर चौघे जखमी
यामध्ये 14 ते 17 वयोगटातील मुलांच्या पालकांना आणि मित्रांनाही विचारलं होतं. फक्त 8 टक्के मुलांनी पॉर्न हे उपयुक्त माहिती देत असल्याचं म्हटलं. मुलींपेक्षा मुलांनी पॉर्नबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं आहे.
रॉथमॅन यांनी म्हटलं की, चिंतेची बाब म्हणजे मोठ्या प्रमाणावर पॉर्नला सेक्सची चांगली माहिती पुरवणारा स्रोत मानणाऱ्यांची संख्या मोठी असणं ही आहे. सेक्सबाबतचं शिक्षण ते असतं जे लैंगिकतेबाबत मी काय विचार करतो. सेक्सबाबत एकमेकांचे विचार, मते आणि संवाद हा महत्त्वाचा ठरतो. संशोधनामुळे तरुणांना सुरक्षित आणि सहमतीने सेक्सबाबत कसं शिकवता येईल हे समजण्यास मदत होईल असंही संशोधकांनी म्हटलं आहे.