esakal | शिकागोत सिरियल किलिंगचा थरार; सनकी व्यक्तीकडून तिघांचा खात्मा तर चौघे जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

serial killing

शिकागो शहरात एक धक्कादायक अशी सिरीयल किलींगची घटना घडली आहे

शिकागोत सिरियल किलिंगचा थरार; सनकी व्यक्तीकडून तिघांचा खात्मा तर चौघे जखमी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शिकागो : शिकागो शहरात एक धक्कादायक अशी सिरीयल किलींगची घटना घडली आहे. एका सनकी व्यक्तीने शहरात चांगलाच हाहाकार माजवला आहे. या इसमाने अंधाधुंद असा गोळीबार करत शिकागो शहरातील निष्पाप तीन लोकांचा बळी घेतला आहे. तसेच अनेकांना विनाकारण जखमी केलं आहे. शिकागो शहरात त्याने केलेल्या या अंधाधुंद गोळीबाराच्या चकमकीत एकूण तीन लोकांचा मृत्यू तर चार लोक जखमी झाले आहेत. हा हल्ला का झाला याचा तपास पोलिस घेत आहेत. 

जेसन नाइटेंगल असं या धुमाकूळ घालणाऱ्या 32 वर्षीय युवकाचं नाव आहे.  त्याच्या या साऱ्या रक्तरंजित धुमश्चक्रीची माहिती शिकागोमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी डेव्हीड ब्राऊन यांनी दिली. या सनकी इसमाने हा हल्ला शनिवारी दुपारनंतर सुरु केला. यामध्ये सर्वांत आधी त्याने शिकागो युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या 30 वर्षीय विद्यार्थ्यांच्या डोक्यात गोळी घालून हत्या केली. ही हत्या हाईड पार्कमधील पार्किंग गॅरेजमध्ये घडली. 
एका अपार्टमेंटच्या 46 वर्षीय गार्ड आणि एका 77 वर्षीय महिलेचाही खात्मा केला. त्यानंतर हा व्यक्ती नाइटेंगल जवळील दुसऱ्या इमारतीत गेला जिथे आणखी एका व्यक्तीची कार त्याने चोरली ज्याला तो आधीपासूनच ओळखत होता. त्यानंतर तो एका स्टोअरमध्ये तो गेला आणि तिथे त्याने पुन्हा गोळीबार केला, ज्यात एका 20 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच एका 81 वर्षीय महिलेच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली. 

हेही वाचा - रहस्यमयी तलाव! पाण्याला स्पर्श करताच प्राणी दगडामध्ये बदलतात
पोलिसांनी म्हटलं की दुकान सोडल्यानंतर या नाइटेंगलने आपल्या आईसोबत गाडीतून जाणाऱ्या  एका 15 वर्षीय मुलीची गोळी मारुन हत्या केली. त्यानंतर तो पुन्हा त्या स्टोअरमध्ये परतला. आणि एका पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबारी केली जो मागच्या गोळीबाराबाबत तपास करत होता. ब्राऊन यांनी म्हटलं की या हल्ल्यात कुणीही जखमी झालेलं नाहीये. नाइटेंगलने यानंतर ईवान्स्टनमधून उत्तरेकडे जवळपास 16 किमीचे अंतर त्याने पार गेलं. एका हॉटेलमध्ये एका महिलेला पुन्हा गोळी मारली. 
त्यानंतर त्या हॉटेलमधून त्याने पार्किंगमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याशी झटापट केली. आणि तिथेही गोळीबार केला. पोलिसांनी या सनकी व्यक्तीला पकडले असून अद्याप पुढील तपास सुरु आहे. या साऱ्या घडामोडीमागच्या कारणांचा शोध पोलिस घेत आहेत. 

loading image
go to top