esakal | 'तो' कॅमेराकडे फक्त 2 तास बघत बसला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

youtuber muhammad didit upload video on youtube 23 lakh views

व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या युट्यूबरवर त्याने एक व्हिडिओ अपलोड केला आणि तब्बल 23 लाखांहून अधिक नेटिझन्सनी तो व्हिडिओ पाहिला. विशेष म्हणजे तो फक्त कॅमेऱयाकडे बघत बसला होता. या व्हिडिओमध्ये दुसरे काही नव्हतेच.

'तो' कॅमेराकडे फक्त 2 तास बघत बसला अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इंडोनेशिया: व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या युट्यूबरवर त्याने एक व्हिडिओ अपलोड केला आणि तब्बल 23 लाखांहून अधिक नेटिझन्सनी तो व्हिडिओ पाहिला. विशेष म्हणजे तो फक्त कॅमेऱयाकडे बघत बसला होता. या व्हिडिओमध्ये दुसरे काही नव्हतेच.

कोरोनामुळे लाखोंच्या नोटा वॉशिंगमशीनमध्ये धुतल्या अन्...

सोशल मीडियावरील युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक हे सध्या झटपट प्रसिद्धी मिळवण्याचे एक व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेकजण एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात येताना दिसतात. असाच एक युवक काही न करता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याने फक्त एक व्हिडिओ अपलोड केला आहे. '2 JAM nggak ngapa-ngapain' अर्थात 'काहीच न करण्याचे दोन तास' असे शीर्षक देत या युवकाने हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला. मोहम्मद दिदीत असे युवकाचे नाव आहे. 10 जुलै रोजी त्याने हा व्हिडिओ अपलोड केला होता. 23 लाख पेक्षा जास्त नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुहम्मदने म्हटले आहे की, 'ओके, मी हा व्हिडिओ का केला याबाबत थोडे लिहिले पाहिजे. इंडोनेशियातील लोकांनी मला युवकांना शिक्षण देणारा व्हिडिओ शेअर करण्यासंदर्भात मागणी केली होती. शेवटी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. तुमच्यावर या व्हिडिओचे फायदे अवलंबून आहेत. माझी अपेक्षा आहे की, तुमचे मनोरंजन होईल आणि या व्हिडिओचा फायदा होईल'

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी प्रतिक्रिया नोंदविण्यास सुरवात केली. 'युवक युट्यूबर चिंतन करत आहे.' 'जेव्हा तुमच्याकडे जगातील सर्वात मोकळा वेळ असतो,' युवकाच्या कल्पकतेचे कौतुक केले पाहिजे, अशा प्रकारे नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहे. विशेष म्हणजे, दोन तासाच्या या व्हिडिओमध्ये काहीही नाही. युवक फक्त कॅमेऱयाकडे पाहात आहे, तरीही 23 लाख नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

चॅलेंज! फोटोमध्ये कुत्र्याला शोधून दाखवाच...