8 वर्ष डेटिंग करुनही प्रपोज केलं नाही, गर्लफ्रेंडनं आपल्या बॉयफ्रेंडला खेचल कोर्टात

Boyfriend For Wasting Her Time
Boyfriend For Wasting Her Time
Updated on

लग्न हे आयुष्याच अंतिम ध्येय आहे का? यावर वाद विवाद होऊ शकतो. काहीजण विवाह बंधनात अडकणे हे आयुष्याच ध्येय अजिबात मानत नाहीत.  एखाद्यासोबत दिर्घकाळ वेळ घालवल्यानंतर त्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याची स्वप्ने बघणाऱ्यांचीही आपल्याकडे कमी नाही. विवाह ही आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मानून प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्यासाठी काहींनी अनेक स्वप्नेही सजवलेली असतात.

झांबियातील एका तरुणीच्या अनोख्या प्रेमाची स्टोरी अशीच काहीशी आहे. तब्बल आठ वर्षांपासून एकासोबत रिलेशनमध्ये होती. नात्यातील पुढची स्टेप घेऊन त्याच्यासोबत लग्न करावे, असे तिला वाटत होते. पण बरीच वर्षे एकत्र घालवल्यानंतरही तिचा बॉयफ्रेंडने तिला लग्नासाठी विचारले नाही. इतका वेळ देऊन आपल्या बॉयफ्रेडने लग्नासंदर्भात विचारले नाही म्हणून गर्ट्रूड एनकोमा या तरुणीने चक्क हरबर्ट सॅलिकी नावाच्या बॉयफ्रेंडला कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानेजवळपास दशकभराचा काळ वाया घालवला असा दावा तिने बॉयफ्रेंडविरोधात ठोकला आहे. एका मुलाचा बाप असलेल्या सॅलीकीने लग्नाचे वचन दिले होते. पण त्याने लग्नासाठी प्रपोज केलेच नाही. लग्नाचे वचन देऊन माझा वेळ वाया घालवला. त्याने माझी फसवणूक केली असे एनकोमा या महिलेनं म्हटलंय. तो नात्यामध्ये सिरियस नव्हता त्यामुळे त्याला कोर्टात खेचल्याची माहिती एनकोमाने केनियन प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. 

याप्रकरणात न्यायालयाने दोघांची बाजू ऐकल्यानंतर कोर्ट या प्रकरणात हस्तक्षेप करु शकत नसल्याचे सांगितले. दोघांनी लग्न केलेलं नाही. त्यामुळे दोघांनी एकत्र बसून कोर्टाबाहेरच प्रकरण मिटवावे, असेही संबधित प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी म्हटले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com