
जगभरात वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक देश मोहिम राबवत आहेत. दुर्मीळ होत चाललेल्या प्राण्यांच्या प्रजाती वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. असे असताना एक देश असा आहे जिथं एकाच वेळी ५० हत्तींची कत्तल करण्याचे आदेश जारी केले आहेत. इतकंच नाही तर हत्तींना ठार केल्यानंतर त्यांचं मांस घरोघरी वाटलं जाणार आहे. आफ्रिकेतील झिम्बॉब्वेत हत्तींची अशी कत्तल करण्यात येणार आहे. तर मांस नागरिकांना वाटले जाईल आणि हत्तींचे दात सरकारकडे सोपवले जातील.