

Donald Trump
sakal
न्यूयॉर्क : ‘‘राजकीय काळोख पसरला असताना या क्षणी न्यूयॉर्कमध्ये मात्र एक नवी पहाट झाली. डोनाल्ड ट्रम्प, मी तुम्हाला जितपत ओळखतो, त्यानुसार तुम्ही आता मला ऐकत असाल. जरा आवाज वाढवा...एवढेच मी तुमच्यासाठी म्हणेन...’’ अशा शब्दांत न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर झोहरान ममदानी यांनी अध्यक्षांना थेट आव्हान दिले. ‘‘न्यूयॉर्कची ओखळ आज स्थलांतरितांमुळेच आहे. आज रात्रीपासून एक स्थलांतरितच न्यूयॉर्कचे नेतृत्व करील,’’ असा ठाम निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.