‘झूम’ चिनी नव्हे अमेरिकी

यूएनआय
Friday, 8 May 2020

झूमबॉम्बिंग
सध्या लॉकडाउनमुळे या ॲपचा वापर अधिक वाढला असला तरीसुद्धा  युजर्संच्या डोकेदुखीतही यामुळे भर पडली आहे. मिटिंग सुरू असताना नको असलेल्या व्यक्तीची होणारी एंट्री, अश्‍लील क्लिप व्हायरल होण्याचे वाढलेले प्रमाण आणि सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवर संवाद व्हायरल होण्याचे वाढलेले प्रमाण आदीबाबींमुळे झूम डोकेदुखीही ठरत आहे.

सध्या लॉकडाउनच्या काळात कार्यालयीन आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या ‘झूम’ या व्हिडिओ कॉलिंग ॲपच्या विश्‍वासर्हतेबाबत सरकारी पातळीवरून बऱ्याच शंका कुशंका व्यक्त होत आहेत. सरकारने  महत्त्वाच्या बैठकांमधून हे ॲप हद्दपार केलेआहे, याला कारण ठरले आहे ते म्हणजे या ॲपचे मूळ.  झूम ॲपची निर्मिती करणारी कंपनी चिनी असल्याची चर्चा सुरू झाली अन् त्याच्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. आता कंपनीनेच हे आरोप फेटाळून लावत आम्ही अमेरिकी आहोत चिनी नाही असे स्पष्टीकरण देत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

युआन यांचा ब्लॉग
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये आमची कंपनी ही अमेरिकी आणि चिनी असल्याचा दावा केला.  सध्या या ॲपच्या मुळाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत याबाबतचे आरोप फेटाळून लावताना त्यांनी कंपनीची वाटचाल आणि तिचा इतिहास लोकांसमोर मांडला. २०१३ मध्ये झूम ॲप लाँच झाल्यानंतर त्याचा वापर केवळ कार्पोरेट कारणांसाठी केला जात होता.

झूमबॉम्बिंग
सध्या लॉकडाउनमुळे या ॲपचा वापर अधिक वाढला असला तरीसुद्धा  युजर्संच्या डोकेदुखीतही यामुळे भर पडली आहे. मिटिंग सुरू असताना नको असलेल्या व्यक्तीची होणारी एंट्री, अश्‍लील क्लिप व्हायरल होण्याचे वाढलेले प्रमाण आणि सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवर संवाद व्हायरल होण्याचे वाढलेले प्रमाण आदीबाबींमुळे झूम डोकेदुखीही ठरत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zoom is American not Chinese