बघा, कोण ठरली यंदाची मिस युनिव्हर्स?

वृत्तसंस्था
सोमवार, 9 डिसेंबर 2019

अमेरिकेतील ऍटलंटा येथे रविवारी 68वा मिस युनिव्हर्स सोहळा पार पडला. या सोहळ्यात 90 सौंदर्यवतींमध्ये ही स्पर्धा झाली, त्यामध्ये जोजिबिनीने बाजी मारली. 

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हीने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे. जोजिबिनीने जगभरातील 90 सौंदर्यवतींना पराभूत करत हा किताब पटकाविला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

अमेरिकेतील ऍटलंटा येथे रविवारी 68वा मिस युनिव्हर्स सोहळा पार पडला. या सोहळ्यात 90 सौंदर्यवतींमध्ये ही स्पर्धा झाली, त्यामध्ये जोजिबिनीने बाजी मारली. 

जोजिबीनीसह 20 सौंदर्यवतींनी सेमीफायनलमध्ये जागा पटकाविली होती. यामध्ये भारताच्या वर्तिका सिंहचाही समावेश होता. मात्र ती टॉप 10 मध्ये आपले स्थान पक्के करु न शक्याने स्पर्धेतून बाहेर पडली. कोलंबिया, फ्रान्स, आईसलॅंड, इंडोनेशिया, मेक्सिको, पेरु, पुएर्टो रिको, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि युनायटेड स्टेट्सच्या सौंदर्यवतींनी टॉप 10 मध्ये स्थान मिळविले होते. 

गतवर्षीची मिस युनिव्हर्स कॅटरिना ग्रे हिने निकाल घोषित केला. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रत्येकाने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत पारंपारिक पोशाख घालायचा होता. त्यावेळी वर्तिक सिंहने लाल रंगाचा घागरा घालून सर्वांची मनं जिंकली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zozibini Tunzi becomes Miss Universe 2019