Michael Lobo
Michael LoboEsakal

गोव्यातील पराभवानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ; मायकल लोबो म्हणाले...

विरोधी पक्ष म्हणून आम्ही भक्कमपणे काम करू: मायकल लोबो
Published on

गोवा : गोव्यात पुन्हा सलग तिसऱ्यांदा भाजप (BJP) सत्तेवर येणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोव्याच्या (Goa) राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. गोव्याच्या जनतेने तृणमुल कॉंग्रेस तसेच आम आदमी पक्षाला (AAP) पूर्ण नाकारले आहे. पंजाबात विजय मिळवलेल्या अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना गोव्यात मात्र आपली जादू दाखविता आलेली नाही. गोव्यात काॅंग्रेसला जम बसवता आला नाही. मात्र त्यांनी १२ जागा जिंकल्या आहेत. झालेला पराभव मान्य करत आम्ही विरोधी पक्ष म्हणून विश्वासार्हपणे काम करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते मायकल लोबो (Congress leader Michael Lobo) यांनी दिली.

यावेळी माध्यमांशी बोलताना लोबो म्हणाले, आम्ही जिंकू असे वाटले होते. पण, आम्हाला जनतेचा जनादेश स्वीकारावा लागेल. आम्हाला १२ जागा मिळाल्या आहेत तर, भाजपला १८ जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भक्कमपणे काम करू. आता आत्मविश्वास जिंकण्यासाठी काँग्रेसला कसरत करावी लागणार असेही ते म्हणाले.

Summary

आम्ही जिंकू असे वाटले होते. पण, आम्हाला जनतेचा जनादेश स्वीकारावा लागेल.

पराभव स्विकारताना लोबो म्हणाले, आम्हाला पराभव स्विकारावा लागेल. कारण हा निर्णय गोव्यातील जनतेचा आहे. आम्ही फक्त १२ जागा जिंकल्या पण आम्ही पराभव स्वीकारावा आहे. मात्र विरोधी पक्ष म्हणून विश्वासार्हपणे काम करू असे असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com