Goa Election : तृणमूलसोबत असलेला मगोप भाजपसोबत जाणार? नेत्याचे संकेत|Goa Assembly Election Result 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Goa Assembly Election Result 2022

Goa Election : तृणमूलसोबत असलेला मगोप भाजपसोबत जाणार? नेत्याचे संकेत

पणजी : विधानसभा निवडणूक निकालापूर्वी (Goa Assembly Election 2022 Result) एक्झिट पोल आले असून गोव्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. गोव्यात त्रिशंकू स्थिती होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर किंगमेकर ठरणारा महाराष्ट्र गोमंतक पक्ष (MGP) कोणासोबत जाणार? ही चर्चा रंगली आहे. त्याबाबत पक्षाच्या एका नेत्यांनी उत्तर दिले आहे.

हेही वाचा: Goa : काँग्रेसला आमदारांच्या EXIT ची भिती? हॉटेलमध्ये ठेवण्याची तयारी सुरु

गोवा निवडणुकीचे एक्झिट पोल खरे ठरले तर गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल. त्यानंतर महाराष्ट्र गोमंतक पक्ष (MGP) हा किंगमेकर ठरणार आहे. पण, मगोपने आधीच तृणमूल काँग्रेससोबत युती केली आहे आणि तृणमूलचा भाजपला तीव्र विरोध आहे. अशातच मगोपच्या एका नेत्यानं मोठं विधान केलं आहे. ''आमची भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. उद्यापर्यंत सर्व काही कळेल. आमची युती असल्याने आम्ही या टप्प्यावर निर्णय घेऊ शकणार नाही. मात्र, आम्हाला खात्री आहे, की आम्हाला १० पेक्षा अधिक जागा मिळतील. पण, कोणासोबत युती करायची हे तृणमूलसोबत बोलून ठरवू. त्यासदंर्भात उद्या दुपारी चार वाजता निर्णय घेऊ,'' असं सुदीन ढवळीकर एडीटीव्हीसोबत बोलताना म्हणाले. तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भाजपला माफ करून सर्वकाही विसरून त्यांच्यासोबत जाणार असल्याचे संकेत देखील ढवळीकर यांनी दिले.

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आमची युती शंभर टक्के राहणार असून निकालानंतर कोणासोबत जायचे आम्ही ठरवू, असंही ढवळीकर यांनी सांगितलं.

मगोपचा भाजपवर राग का? -

मनोहर पर्रीकर यांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रं ही प्रमोद सावंत यांच्याकडे आली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या काही मंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे मगोपची भाजपवर नाराजी आहे. पण, मगोप भाजपसोबत गेला तर त्यांनी एक अट ठेवली आहे. प्रमोद सावंत यांना पदावरून हटवल्यानंतर आम्ही युती करू, अशी ही अट असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Web Title: Goa Assembly Election Result 2022 Mgp May Alliance With Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..