कॅन्सरच्या 'या' 4 प्राणघातक लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

Pancreatic Cancer
Pancreatic Canceresakal

कर्करोग (Pancreatic Cancer) समजून येण्यासाठीच वेळ लागतो, याची अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याच वेळेस उशिरा निदान झाल्याने उपचार करता येत नाही व लवकरच रुग्ण दगावतो. जगातील सुमारे एक तृतीयांश लोक कर्करोगाच्या या घातक लक्षणांकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच स्वादुपिंडाच्या कर्करोगाची जी सर्वात घातक चार लक्षणे आहेत जी नाकारली जाऊ नयेत, असा इशारा Pancreatic Cancer UK संस्थेकडून देण्यात आला आहे.

लक्षणे आढळली तर विलंब करू नका....

जर तुम्हाला पाठदुखी, अपचन, पोटदुखी आणि वजन कमी झाल्यामुळे चार आठवड्यांपेक्षा जास्त काळ त्रास जाणवत असेल तर अनेक जणांचा समज होतो की रुग्णाला कावीळ झाली आहे, पण त्वचा किंवा डोळे पिवळे पडणे, अशी लक्षणे दिसल्यास लोकं घरघुती उपचार करून रोगाचे निदान होण्यासाठी प्रतिक्षा करतात. जे सर्वात "चिंताजनक" असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. जवळपास 28 टक्के लोक नवीन लक्षणे दिसल्यानंतर मदत घेण्यापूर्वी तीन महिने प्रतीक्षा करतात. दरम्यान 2,000 प्रौढांच्या सर्वेक्षणात असेही आढळून आले की 31 टक्के लोक साथीच्या आजारावर उपचार करण्यास बराच विलंब करतात.

बऱ्याच लोकांना 'हा' कर्करोग होतोच असे नाही

यापैकी काही किंवा सर्व लक्षणे आढळल्यास लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. असेही संस्थेने सांगितले, कारण बऱ्याच लोकांना स्वादुपिंडाचा कर्करोग होतोच असे नाही. "परंतु लोकांनी या आजाराबद्दल अधिक जाणून घेणे, त्याच्या लक्षणांविषयी प्रियजनांशी बोलणे आणि डॉक्टरकडे जाऊन निदान करणे अत्यंत आवश्यक आहे." यूकेमध्ये कोणत्याही सामान्य कर्करोगापेक्षा स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा मृत्यू दर अधिक आहे. संस्थेचे म्हणणे आहे की या आजाराने ग्रस्त अर्ध्याहून अधिक लोक निदान झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत मरण पावतात. स्वादुपिंडाचा कर्करोग हा यूकेमधील कर्करोगाचा अकरावा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि कर्करोगाच्या मृत्यूचे सहावे सर्वात मोठे कारण आहे.

नॉर्मल पेशींचा मृत्यू

हा रोग पाचन तंत्राचा भाग असलेल्या मोठ्या ग्रंथीवर परिणाम करतो. स्वादुपिंड ही पोटाच्या मागे आणि यकृताच्या खाली असलेली एक लांब ग्रंथी आहे. त्याची दोन मुख्य कार्ये आहेत: अन्नाचे विघटन करण्यास मदत करण्यासाठी पाचक एंझाइम आतड्यात टाकणे आणि रक्तातील साखरेचे नियमन करण्यासाठी इंसुलिन आणि ग्लुकागन हार्मोन्स सोडणे. स्वाआपल्या स्वादुपिंडाच्या पेशींमध्ये जनुकीय बदल होऊन नॉर्मल पेशींचा मृत्यू होतो. कर्करोगाच्या पेशींचा प्रादुर्भाव होऊन गाठी निर्माण होतात. बरेचदा स्वादुपिंडाचा कर्करोग हा स्वादुपिंडाच्या नलिकेपासून होतो.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे :

प्राथमिक स्वरूपात या आजाराची फारशी लक्षणे नसतात, पण तो पुढे जातो तेव्हाच त्याची ती दिसू लागतात.

पोटाच्या वरच्या भागात दुखणे व दुखणे पाठीत पसरणे.

कावीळ होणे- या काविळीत सुरुवातीस काहीच दुखत नाही व पिवळटपणा वाढत जातो.

भूक न लागणे

वजन कमी होणे

नैराश्य जाणवणे

पॅनक्रियाटिक कॅन्सर यूकेच्या सीईओ डायना ज्युप म्हणाल्या “लोकांनी लक्षणं समजून न घेता निदान करण्यास विलंब करणे हे खूप चिंताजनक आहे. कोविड-19 मुळे स्वादुपिंडाचा कर्करोग दूर झालेला नाही. स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ नाही. वर्षाला हजारो लोक, अजूनही कॅन्सर हा शब्द ऐकून त्रस्त आहेत, रोगाचे निदान करण्यास विलंब होत असल्यामुळे खूप उशीर होतो, आणि त्यानंतर काहीही केले जाऊ शकत नाही.

आपल्या पोटात जठराच्या मागे स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव असतो. तो पाचक रस व इन्सुलिन निर्माण करतो. पाचक रसाने अन्नपचनास मदत होते. इन्सुलिनमुळे साखरेचे प्रमाण योग्य ठेवले जाते व इन्सुलिन कमी झाल्यास डायबेटिस होतो. स्वादुपिंडालाही कर्करोगाची बाधा होऊ शकते. इतर कर्करोगांच्या मानाने हा कर्करोग लवकर पसरतो व रुग्ण त्या मानाने लवकर दगावतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com