National Apple Day - सफरचंद खाण्याचे हे आहेत 8 फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

apple

National Apple Day - सफरचंद खाण्याचे हे आहेत 8 फायदे

सफरचंद खाणे अनेकांना आवडते. लहान मुलांना आवर्जून सफरचंद खायला दिले जाते. An apple a day keeps the doctor away अशी एक इंग्रजीत म्हण आहे. ही म्हण तंतोतंत खरी असून सफरचंद खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता.

हेही वाचा: जर्दाळू आरोग्यासाठी लाभदायी; भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म

वजन होते कमी- एखादे सफरचंद खाल्ले की पोट चांगले भरते. लगेच भूक लागत नाही, परिणामी तुमच्या तोंडावर ताबा राहतो. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हिमोग्लोबिन मिळते - जर तुम्ही दिवसाला 2 ते 3 सफरचंद खाल्लीत तर, तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. मोठ्या प्रमाणात जस्त असल्याने हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

हाडे होतात मजबूत - सफरचंदामध्ये फ्लावनोईड हा घटक असतो. ज्या महिलांना ओस्टियोपोरोसिस असतो त्यांना सफरचंद खाल्ल्याने फायदा होतो. फ्लावनोईडमुळे हाडे मजबूत होतात. सफरचंद खाल्याने फ्लावनोईडही पोटात जात असल्याने आपोआप हाडे मजूबत होण्यास मदत मिळते.

किडनी स्टोनपासून मुक्ती- सफरचंद खाल्ल्याने किडनी स्टोन तयार होत नाहीत. त्यामुळे सफरचंद खाणे अतिशय चांगले.

पचनशक्ती वाढते- सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात 'फायबर' असते. त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

यकृताचे आजार नाहीसे - जर तुम्हाला यकृतासंबंधित गंभीर समस्या असेल तर रोज एक सफरचंद खावे. सफरचंदाचा रस यकृताचे आजार बरे करण्यास फायदेशीर ठरतो.

कॅन्सरचा धोका कमी - सफरचंदामधील क्वरसिटीन हा घटक आपल्या शरीरातील पेशींना नुकसानापासून वाचवतो. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

कोंडा होतो कमी- सफरचंदाचा रस केसांच्या मुळांना चोळावा, थोड्यावेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.