"ब 12' जीवनसत्त्व - दुर्लक्षित, पण महत्त्वाचे 

"ब 12' जीवनसत्त्व - दुर्लक्षित, पण महत्त्वाचे 

"ब 12' हे एक आवश्‍यक जीवनसत्त्व आहे. पण, ते आहारामधूनच मिळवावे लागते. कारण आपले शरीर ते तयार करू शकत नाही. आपल्या शरीरात लाल रक्तपेशी आणि "डीएनए'ची निर्मिती करण्यात या जीवनसत्त्वाची महत्त्वाची भूमिका असते. त्याचप्रमाणे, मज्जासंस्थेचे आणि प्रतिकारशक्तीचे कार्य सुरळीत चालण्यासाठीही ते महत्त्वाची भूमिका बजावते. 

निरामय आरोग्यासाठी आपल्या शरीरात जीवनसत्त्वांचे योग्य प्रमाण गरजेचे असते. जीवसत्त्वांचे प्रमाण तपासण्यासाठी रक्तचाचणी केली, तर अनेकजणांमध्ये "ब 12'चे प्रमाण कमी आढळेल. सध्याच्या काळात ही बाब कॉमन झालीय. खरेतर ही केवळ जीवनसत्त्वाची कमतरता नव्हे, तर समाजात तो सर्वसाधारणपणे आढळणारा सिंड्रोम बनलाय. केवळ शाकाहारी व्यक्तींमध्येच "ब 12' जीवनसत्त्वाची कमतरता आढळत नाही, तर मांसाहार करणाऱ्या व्यक्तीही त्याच्या कमतरतेमुळे ग्रस्त आहेत. त्यामुळेच, "ब 12' जीवनसत्त्व म्हणजे काय, ते एवढे महत्त्वाचे का आहे, त्याची कमतरता का निर्माण होते, आदी प्रश्न उपस्थित होतात. या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू. 

"ब 12' जीवनसत्त्व म्हणजे काय? 
हे जीवनसत्त्व "कोबाल्मिन' म्हणूनही ओळखले जाते. आपल्या शरीरातील ते पाण्यात विरघळणारे महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. "ब 12' हे एक आवश्‍यक जीवनसत्त्व आहे, म्हणजेच तुम्हाला ते पदार्थांमधूनच मिळवावे लागते. कारण आपले शरीर ते तयार करू शकत नाही. आपल्या शरीरात लाल रक्तपेशी आणि "डीएनए'ची निर्मिती करण्यात या जीवनसत्त्वाची महत्त्वाची भूमिका असते. त्याचप्रमाणे, मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यामध्येही हे जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे जीवनसत्त्व शरीरात कसे शोषले जाते? 
खरेतर, "ब 12' जीवनसत्त्वाचे शोषण म्हणजे आपल्या पचनसंस्थेत घडणारी एक प्रकारची अनेक टप्प्यात होणारी मालिकाच असते. तुम्ही "ब 12' जीवनसत्त्वयुक्त पदार्थ खाल्ले आणि त्यांचे शोषण झाले, अशी एका टप्प्यातील ती प्रक्रिया असत नाही. तुमच्या लाळेतील आर - बाईंडर या एन्झाईमपासून इंट्रेनसिक फॅक्‍टर नावाचा एन्झाईम ते छोट्या आतड्याच्या टोकाला असणाऱ्या Y रिसेप्टरपर्यंतचे सर्व घटक या जीवनसत्त्वाच्या शोषणात महत्त्वाची भूमिका बजावतात. थोडक्‍यात, "ब 12' जीवनसत्त्वाच्या शोषणात अशा अनेक घटकांचा सहभाग असतो. 

आपण "ब 12 'जीवनसत्त्वाचे शोषण कसे होते, हे समजून घेतले. त्यात अनेक टप्पे असतात. या जीवनसत्त्वाच्या शोषणात वेगवेगळ्या एन्झाईम्सचा समावेश असतो. त्यामुळे केवळ "ब 12' जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे, पुरेसे ठरत नाही. त्यासाठी तुमच्या शरीरामध्ये ते शोषून घेण्यासाठी आवश्‍यक अशा सर्व गोष्टी, यंत्रणा योग्य ठिकाणी असण्याची व त्यांनी व्यवस्थित कार्य करण्याची आवश्‍यकता असते. शरीरामध्ये एन्झाईम निर्मितीमध्ये काही समस्या असल्यास, रिसेप्टर ठीक काम करत नसल्यास व इतर घटकांमध्येही अडचण असल्यास शोषणास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, अशी व्यक्ती "ब 12' जीवनसत्त्वाचे शोषण करू शकत नाही. 

"ब 12' जीवनसत्त्वाची कार्ये 
या जीवनसत्त्वाचा लाल रक्तपेशींच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असते. या प्रक्रियेला इरिथ्रोपोयसिस (erythropoiesis) असे म्हणतात. त्याचप्रमाणे, या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींचा आकारही वाढू शकतो. ही प्रक्रिया मेगालोब्लास्टिक अनेमिया (megaloblastic anemia) म्हणून ओळखली जाते. होमिओसिस्टिन (homeocystine) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एन्झाईमची पातळी वाढते. त्यातून हदयाशी संबधित समस्याही उद्‌भवू शकतात. या दोषालाही "ब 12' जीवनसत्त्वाची कमतरता कारणीभूत असते. नव्या मज्जातंतूंची निर्मिती आणि वहनासाठीही "ब 12' अतिशय महत्त्वाचे असते. प्रतिकारशक्तीचे कार्य सुरळीत चालण्यामध्येही हे जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. 

कोणत्या पदार्थांमध्ये "ब 12' जीवनसत्त्व अधिक असते. सप्लिमेंट्‌सचे पर्याय कोणते? 
या जीवनसत्त्वाचे प्रमाण 250 ते 900 नॅनोग्रॅम्स प्रतिमिलिलिटर असते. प्रामुख्याने चिकन, मासे, अंडी, चीज, दही आदी पदार्थ हे या जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहेत. सामान्यत: ते शाकाहारी पदार्थांमध्ये कमी प्रमाणात असते. तुमच्यामध्ये हे जीवनसत्त्व कमी असेल तर डॉक्‍टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्‌स घेण्याचा पर्याय आहे. तुम्ही गोळ्या किंवा इंजेक्‍शनमधून ते घेऊ शकता. त्याचप्रमाणे, मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनाही डॉक्‍टरांच्या सल्ल्याने "ब 12' जीवनसत्त्वाची इंजेक्‍शन घेता येतील. 

(अनुवाद : मयूर जितकर) 

पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com