Bones Health|हाडे मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमच का? पाच घटकांचाही करा आहारात समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bones
Bones Health|हाडे मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमच का? पाच घटकांचाही करा आहारात समावेश

हाडे मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमच का? पाच घटकांचाही करा आहारात समावेश

हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमचे महत्व मोठे असल्याचे सर्वांना माहिती आहे. केवळ केल्शियममुळे (Calshium) तुमचे आरोग्य (Health) चांगले राहते, असा एक समज आहे. पण आणखीही पोषकतत्वे तुमच्या शरीरातील हाडे निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतात. त्यामुळे या पोषकतत्त्वाची नीट माहिती असणे गरजेचे आहे.

बंगलोरच्या फोर्टिस हॉस्पिटल्सचे सल्लागार, डॉ. योगेश के यांनी सांगितले की, , “कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा पोषक घटक (Nutrition) आहे. इतर पोषक तत्वे शरीरातील कॅल्शियमचे शोषण करतात शिवाय ते हाडात जमा होण्यापर्यंत विविध स्तरांवर कार्य करण्यास मदत करतात. म्हणूनच आपल्या आहारात इतर पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश करणे हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे आहे.

Vitamin D

Vitamin D

व्हिटॅमिन डी (Vitamin D)

सुर्यप्रकाशातून (Sun) आपल्याला पोषक तत्व मिळतात. जी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. आतड्यात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. हाडांची घनता वाढविण्यासाठी आणि हाडे निरोगी राखण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी वाढविण्यासाठी आहारात फॅटी फिश ( स्वोर्डफिश, सेलमन, सार्डिन, मॅकरेल), दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य आणि अंड्यातील पिवळा बलक यांसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.

हेही वाचा: हृदयाच्या आरोग्यासाठी बसा उन्हात, मिळेल व्हिटॅमिन डी, संशोधनात स्पष्ट

कडधान्य

कडधान्य

मॅग्नेशियम (Magnesium)

सर्व जीवनसत्त्वांप्रमाणे, खनिजे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मॅग्नेशियम त्यापैकी एक आहे. मॅग्नेशियम ल कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे योग्य प्रमाण नियंत्रित करते आणि हाडांची घनता आणि हाडांच्या क्रिस्टल्सची निर्मिती सुधारते. मेनोपॉझ नंतर महिलांना ऑस्टियोपोरोसिस चा धोका असतो तो धोका मॅग्नेशियमच्या नियमित सेवनाने कमी होतो. हिरव्या भाज्या, बीज (खसखस, तिळ,चिया), नट्स, शेंगा, कडधान्य आणि एवोकॅडोच्या सेवनाने तुम्हाला मॅग्नेशियम मिळू शकते.

milk

milk

फॉस्फरस (Phosphorus)

फॉस्फरस (Phosphorus) हा हाडांच्या (Bones)आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा पोषक घटक आहे. हा हाडांच्या खनिजीकरणाचा एक भाग आहे. तसेच आम्लयुक्त पदार्थांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी फायद्याचे आहे. कारण तुमच्या हाडांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. मुबलक फॉस्फरस मिळण्यासाठी तुम्ही आहारात सोयाबीन, मासे, मांस, दूध, अंडी, कडधान्ये , डाळींचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Banana Side effects: 'या' लोकांनी चूकूनही खाऊ नये केळ, नाहीतर...

vitamin a

vitamin a

व्हिटॅमिन ए (vitamin A)

तुमची दृष्टी सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए (vitamin A)चे सेवन फायद्याचे आहे. यामुळे तुमची न्यूरोलॉजिकल फंक्शन्स कार्यन्वित राहतात. त्वचा (Skin) निरोगी राहण्यासाठीही फायदा होतो. तसेच तुमच्या हाडांचे आरोग्यही सुधारते. "व्हिटॅमिन ए ऑस्टियोब्लास्ट्स (हाडे बनवणाऱ्या पेशी) आणि ऑस्टियोक्लास्ट्स (हाडे मोडणाऱ्या पेशी) वर प्रभाव पाडते. त्यामुळे तुमच्या हाडे आणि दातांची ताकद सुधारते. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी रताळे, पालक, गाजर, खरबूज, आंबा, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी नियमित खाणे गरजेचे आहे.

हेही वाचा: हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन 'D' हवेच

झिंक

झिंक

झिंक (zink)

झिंक (Zink) हे आहारातील महत्वाचे पोषक तत्व आहे. गर्भधारणा, बालपण आणि पौगंडावस्थेतील जनुक अभिव्यक्ती, पेशींचा विकास आणि प्रतिकृतीमध्ये झिंकाची महत्त्वाची भूमिका आहे. झिंक हाडांच्या खनिजीकरणासाठी आणि व्हिटॅमिन डी आणि प्रथिने संश्लेषणासाठी रिसेप्टर प्रोटीन्स स्थिर करण्यासाठी जबाबदार आहे. हे शेलफिश, बिया, बीन्स, संपूर्ण धान्य आणि दही खाल्ल्याने आपल्याला मिळते.

Web Title: Add These Five Nutrients Along With Calcium In Your Diet For Bone

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bone HealthBone fragility
go to top