घसा बसलाय? दुर्लक्ष करू नका, ही असू शकतात कारणं

akola news Sore throat? Dont ignore it, there may be reasons
akola news Sore throat? Dont ignore it, there may be reasons

अकोला:  सर्दी आणि सायनसच्या संसर्गामुळे सामान्यतः घसा खवखवण्याची समस्या उद्भवते. या समस्येसह, काही इतर लक्षणे देखील दिसली आहेत, जसे की घसा खाजवणे, जळजळ होणे किंवा कोरडे पडणे. अशा परिस्थितीत, जर ही समस्या दोन आठवड्यांत सोडविली गेली नाही तर डॉक्टरांशी संपर्क साधणे देखील आवश्यक आहे. 

घसा बसणे, हा एक सामान्य आणि सहसा दुर्लक्षित केला जाणारा त्रास आहे.  हवामानात बदल झाला की, उदभवणाऱ्या आजारांपैकी एक आजार म्हणजे, घसा बसणं.
घशाला वारंवार कोरड पडणे, जळजळ होणे हे घसा बसला की त्याबरोबर होणारे इतर त्रास असतात.
सर्दी, खोकला किंवा सायनस मधील इन्फेक्शन हे घसा बसण्याचे कारण असू शकते.  
जास्त जोरात बोलल्याने किंवा जास्त वेळ बोलत राहिल्याने स्वरयंत्रावर ताण येऊन सुद्धा घसा बसू शकतो.
अति थंड किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने सुद्धा घसा बसू शकतो.
याशिवाय मोठे आजार म्हणजे थायरॉईड किंवा घशाचा कॅन्सर ही सुद्धा घसा बसण्याची करणं असतात.

अर्थात मोठ्या आजारांशीवाय हा काही खूप मोठा त्रास नसतो, एक दोन आठवड्यात हा बरा होऊ शकतो.

घसा बसण्यावर घरगुती उपाय:
१) आले आणि मध: घसा बसल्यास आल्याचा तुकडा मधा बरोबर चावून खाल्ल्यास आले आणि मधामुळे घशातील इन्फेक्शन, सूज आणि कफ कमी व्हायला मदत होते.

अशा वेळी दोन ते तीन वेळा आले व मध खाल्ल्यास आवाज मोकळा व्हायला मदत होते.

२) मध आणि लवंग : मध आणि लवंगाच्या पावडरचे चाटण घेत राहिल्यास घशाला आराम मिळून आवाज मोकळा होतो.
३) आले : एक मोठा कप भर पाण्यात ३ ते ४ आल्याचे तुकडे टाकून ते पाणी चांगले उकळून घ्यावे. घसा बसलेला असताना रोज दिवसातून दोन वेळा हे पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळतो.

४) लिंबु आणि आल्याचा रस: वरील उपयात सांगितल्या प्रमाणे आल्याचा रस तयार करून त्यात लिंबाचा रस हे मिश्रण रोज दोन वेळा घेतल्याने. घसा बसलेला असल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते.

५) मध : मध हे नसर्गिक अँटिबायोटिक असल्याने कोमट पाण्यात मध घेतल्याने सुद्धा घशातील इन्फेक्शन आणि सूज कमी व्हायला मदत होते.

६) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या : मीठ हे अँटिसेप्टिक असल्याने गळ्यातील इन्फेक्शन कमी करायला मदत करते. 
कोमट पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या करत राहिल्याने लवकरच घशाला आराम मिळून आवाज मोकळा व्हायला मदत होते.

७) लसूण आणि मध : लसणामुळे घशाची सूज कमी व्हायला मदत होते.

दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक करून त्यात मध घालून ते चाटण दिवसातून तीन ते चार वेळा घेतल्यास घशाची सूज जाऊन इन्फेक्शन कमी होते. आणि लवकरच आराम मिळतो.

८) घसा बसल्यास कांद्याचा उपयोग : खाण्यातल्या वापराशिवाय कांद्याचा औषधीय उपयोग सुद्धा होतो.

कांद्यामध्ये असलेल्या फेटोनाईट्समध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे कफ पातळ होतो, तसेच घसा मोकळा व्हायला मदत होते.

यासाठी कांद्याचा रस करून त्याचे चाटण दिवसातून तीन वेळा घेतल्यास घशाला आराम मिळतो.

या घरगुती उपयांबरोबरच काही काळजी घेतली तर लवकरच हा त्रास कमी होऊ लागतो.
१) ओरडणे किंवा जास्त बोलणे टाळा.

२) धूम्रपान करू नका. किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती जवळ उभे राहा नका.

३) मद्यपान टाळा

४) जास्तीत जास्त पाणी प्या

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com