केस खूप गळताहेत? करून बघा घरगुती उपाय

allouvera
allouvera

नागपूर : दोन महिला एकत्र आल्या की सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केस. कारण बहुतेक प्रत्येकीलाच केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. आणि याला कारण वाढलेले प्रदुषण.
आणि तणावयुक्त जीवनशैली. जी आज जवळपास प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. त्यामुळे केस गळती ही कॉमन समस्या आहे. केस गळणे थांबावे यासाठी प्रत्येकच महिला उपाय शोधत असते. अशावेळी अनेकजण वैद्यकीय सल्ला घेतात. केसांची स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची आहे, त्याबरोबरच काही घरगुती उपाय केल्यास केस गळती कमी होऊ शकते.

कोरफड अनेक समस्यांवर आयुर्वेदिक औषध म्हणून ओळखले जाते. कोरफड केसांसाठी बर्ऱ्यापैकी फायदेशीर ठरू शकते. कोरफडीचा वापर केसांच्या वाढीसाठी आणि त्वचेला ग्लो येण्यासाठी करतात. यामुळे तुमचे केस लवकर आणि दाट वाढण्यात मदत होईल. केस वाढण्यासाठी केसांना जास्तीत जास्त मालिश करण्याची गरज असते. अशावेळी कोणते तेल वापरावे याबबात मनात शंका असते. अशावेळी नॅचरल ऑईलचा वापर करावा. त्यामुळे केस गळणेही कमी होईल.

कोरफडीमध्ये अनेक आयुर्वेदीक गुणधर्म आहेत. यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. केसांचे उत्तम पोषण करण्यासाठी कोरफडीच्या तेलाचा उपयोग करू शकता. कोरफडीबरोबरच जोजोबा ऑईल, ऑलिव ऑईल, या तेलांमध्ये नारळाचे तेल मिक्स करून त्याचा वापर केसांसाठी करता येतो. केसांच्या मुळांना हलक्या हाताने या तेलाने मालिश करावे.

कोरफडीचे तेल कसे तयार करायचे
कोरफडीमध्ये अनेक आयुर्वेदीक गुणधर्म आहेत. यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. केसांचे उत्तम पोषण करण्यासाठी कोरफडीच्या तेलाचा उपयोग करू शकता. कोरफडीबरोबरच जोजोबा ऑईल, ऑलिव ऑईल, या तेलांमध्ये नारळाचे तेल मिक्स करून त्याचा वापर केसांसाठी करू शकता. तुमच्या केसांना आमि त्यांच्या मुळांना हलक्या हाताने या तेलाचा वापर करायचा आहे. यासाठी कोरफडीचे तेल कसे तयार करायचे याची कृती बघूया

सविस्तर वाचा - थांबवता येऊ शकते आत्महत्या ! केवळ हवा असतो पाठीवर आपलेपणाचा हात

साहित्य
कोरफडीचे पान
अर्धा कप नारळाचे तेल

कृती
कोरफडीचे स्वच्छ धूवुन घ्यावे. सुरीच्या मदतीने वरील भाग अलगद काढावा. आतले कोरफडीचे जेल सावधानपुर्वक एका भांड्यात काढून घ्यावे. आता नारळाच्या तेलात हे कोरफडीचे जेल मिसळावे. मिश्रण नीट एकजीव होण्यासाठी मिक्सरचाही वापर करू शकता. अशा पध्दतीने कोरफडीचे तेल तयार होईल. हे तेल आपण केस आणि त्वचा मॉइश्चरायझर करण्यासाटी वापरू शकतो.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com