खोकल्यामुळे हैराण आहात? 5 पदार्थांचे सेवन ठरू शकते फायद्याचे

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 12 November 2020

बदलणाऱ्या हवामानामध्ये सर्दी-खोकल्याचा आजार होणे सर्वसाधारण गोष्ट आहे.

बदलणाऱ्या हवामानामध्ये सर्दी-खोकल्याचा आजार होणे सर्वसाधारण गोष्ट आहे. या काळात कोरड्या खोकल्याची समस्या वाढू शकतात. अशावेळी खाण्यामध्ये केलेला बदल आणि काही घरगुती पदार्थांचे सेवन फायद्याचे ठरु शकते. सध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरु आहे. खोकला येणे कोरोनाचे एक लक्षण आहे. त्यामुळे साधारण खोकला लवकरात लवकर घालवणे आवश्यक ठरते. 

पुढील पदार्थांचे सेवन केल्यास खोकल्यापासून मिळू शकते सुटका

-दोन चमचा मधामध्ये ज्येष्टमध चूर्ण (मुलैठी) टाकून चाटून खा. खूप जास्त खोकला येत असल्यास दिवसातून तीन वेळा असे करु शकता. ज्येष्टमध आणि मधाचे सेवन उपाशीपोटी करु नका. ओला खोकला असल्यास ज्येष्टमधाचे सेवन करा, पण कोरडा खोकला असल्याचे ज्येष्टमध खाणे टाळा.

-दूध आणि आद्रकला गरम करा, त्यानंतर थोडा गुळ टाका आणि त्यानंतर थोडी हळद टाकून मिश्रणाला गाळून प्या.

- रात्री झोपताना दुधामध्ये ज्येष्टमध टाकून प्या. त्यामुळे गळ्यातील खरखर कमी होण्यास मदत होते. 

-काळी मिर्ची आणि मध अॅन्टी इन्फेमेंटरी असते, शिवाय हे पदार्थ अॅटी ऑक्सीडेंट सुद्धा असतात. यांच्या सेवनामुळे सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळू शकतो.  एक चमच्या मधामध्ये काळी मिर्चीची पावडर टाकून त्याचे सेवन केले जाऊ शकते. दररोज याचे सेवन केल्याच काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. 

- तुळशीचे पाण, गुळ आणि लवंग पाण्यात टाकून थोडावेळ उकळा. या काढ्याचे सेवन गेल्यास सर्दी आणि खोकल्यापासून सुटकारा मिळू शकते. 

-दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानासाठी आहे. ही माहिती योग्य वैद्यकीय सल्ल्याला पर्यायी ठरु शकत नाही. खूप दिवस खोकला राहिला असल्यास किंवा खूप त्रास जाणवत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annoyed by coughing Consumption of 5 foods can be beneficial