esakal | भारतीय पोषण खजिना : सत्त्वगुणी नाचणी 
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय पोषण खजिना : सत्त्वगुणी नाचणी 

नाचणीमध्ये कार्बोहायड्रेट्स उत्तम प्रमाणात असतात आणि तिचे कण पॉलिश किंवा प्रोसेस करण्याच्या दृष्टीनं खूप लहान असल्यानं ते बहुतांश वेळा मूळ स्वरूपातच खाल्ले जातात.

भारतीय पोषण खजिना : सत्त्वगुणी नाचणी 

sakal_logo
By
डॉ. मनीषा बंदिष्टी

नाचणी हे अतिशय पौष्टिक धान्य असून, चांगलं आरोग्य राखण्यासाठी ती अतिशय उपयुक्त असते. एक चांगली गोष्ट म्हणजे, नाचणीमध्ये कार्बोहायड्रेट्स उत्तम प्रमाणात असतात आणि तिचे कण पॉलिश किंवा प्रोसेस करण्याच्या दृष्टीनं खूप लहान असल्यानं ते बहुतांश वेळा मूळ स्वरूपातच खाल्ले जातात.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाचे घटक आणि फायदे
नाचणी हा नैसर्गिक कॅल्शियमचा अतिशय उत्तम स्रोत असून, वाढत्या वयातली मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना हाडं बळकट होण्यासाठी ती उपयुक्त ठरते.
नाचणी नियमित खाल्ल्यानं हाडांचं आरोग्य चांगलं राहतं आणि ओस्टिओपोरायसिससारख्या आजारांना प्रतिबंध होतो आणि हाडं फ्रॅक्चर होण्याचे धोके कमी होऊ शकतात.
नाचणी मधुमेहामध्ये रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडू शकते.
नाचणी हा नैसर्गिक लोहाचाही उत्तम स्रोत असतो आणि ती खाल्ल्यामुळे अनेमियातून बरे होण्यासाठी मदत होऊ शकते.
नाचणीमध्ये कॅल्शियम आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असल्यामुळं गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ती उपयुक्त असते.
ती ग्लुटेन-मुक्त असते आणि ज्यांना ग्लुटेन किंवा लॅक्टोजचा त्रास होतो त्यांना ती पूरक ठरते.
तिच्यात प्रोटिन भरपूर असतं, त्यामुळं शाकाहारी लोकांच्या दृष्टीनं ती चांगली असते.
तिच्यात तंतूमय पदार्थ चांगले असतात.
नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्सही असतात- ज्यामुळं ती संसर्गांशी लढण्यासाठी ती मदत करू शकते.
नाचणीच्या पिठात मॅग्नेशिअम असतं, त्यामुळं चेतासंस्थेचं कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि हृदयाचे ठोके नॉर्मल राहण्यासाठी नाचणीचं पीठ उपयुक्त ठरतं.

नाचणीचे लाडू
घटक :  नाचणीचं पीठ एक कप, तूप अर्धा कप, पाम शुगर अर्धा कप, खोवलेलं खोबरं पाव कप, काळे तीळ दोन टेबलस्पून, शेंगदाणे दोन टेबलस्पून, बदाम आठ-दहा, वेलदोडा पावडर पाव टेबलस्पून

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृती
एका उधळ कढईत मंद आचेवर काळे तीळ, शेंगदाणे आणि खोवलेलं खोबरं स्वतंत्रपणे परतून घ्या. ते गार करायला बाजूला ठेवा. शेंगदाण्यांची सालं काढून घ्या.
कढईत एक टेबलस्पून तूप घाला आणि त्यात बदाम एक किंवा दोन मिनिटं परता आणि ते बाजूला काढून ठेवा.
कढईत नाचणीचं पीठ दोन-तीन टेबलस्पून तुपासह घाला आणि पंधरा-वीस मिनिटं परता. गरज असल्यास आणखी तूप घालू शकता.
परतलेले काळे तीळ, शेंगदाणे, बदाम आणि खोबरे घाला आणि हे मिश्रण हलवत राहा.
पाम शुगर आणि वेलदोडा पावडर घाला आणि आणखी दोन मिनिटं मिश्रण हलवा.
गॅस बंद करा आणि ते गार होऊ द्यात. 
तुमच्या तळहातांना तूप लावा. या मिश्रणातले तीन-चार टेबलस्पून घ्या आणि ते वळून त्यांचा लाडू तयार करा. आवश्यकता भासल्यास लाडूच्या भोवतीही तूप लावा.
खाण्याची पद्धत
नाचणीचे लाडू हा आपल्याकडचा पारंपरिक पदार्थ आहे, मात्र हल्ली रोजच्या खाण्यात त्याचा वापर कमी होतो. नाचणी लाडूंबरोबरच भाकऱ्या, पुरी, डोसे, चकल्या, थालीपीठ, चिक्की यांच्या माध्यमातूनही खाल्ली जाऊ शकते आणि ती वेगवेगळी पीठं, कडधान्यं आदींबरोबरही मिक्स करता येते.

डॉ. मनीषा बंदिष्टी, ओबेसिटी आणि लाइफस्टाईल मॅनेजमेंट कन्सल्टंट

loading image