esakal | #PCOD : जाणून घ्या, पीसीओडी म्हणजे नेमकं काय?
sakal

बोलून बातमी शोधा

 #PCOD : जाणून घ्या, पीसीओडी म्हणजे नेमकं काय?

कधीकाळी मासिक पाळीविषयी गुपचूपपणे होणारी चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.

#PCOD : जाणून घ्या, पीसीओडी म्हणजे नेमकं काय?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही काळापासून स्त्रियांमध्ये पीसीओडी या समस्येविषयी चर्चा होऊ लागली आहे. मासिक पाळीशी संबंधित ही समस्या अनेक महिलांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच कधीकाळी मासिक पाळीविषयी गुपचूपपणे होणारी चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. महिला त्यांच्या मासिक पाळीविषयी उघडपणे बोलू लागल्या आहेत. व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मासिक पाळीशी संबंधित अनेक आजार,समस्यादेखील पुढे येऊ लागल्या आहेत. यामध्येच गेल्या काही काळात महिलांमधील पीसीओडी ही समस्या वेगाने वाढतांना दिसत आहे. जवळपास १०० पैकी ६० टक्के महिलांमध्ये ही समस्या असल्याचं पाहायला मिळतं. 

पीसीओडीची समस्या असलेल्या महिलांमध्ये खासकरुन लठ्ठपणा किंवा वाढतं वजन या दोन समस्या प्रामुख्याने दिसून येतात. त्यामुळे वाढलेल्या वजनामुळे अनेक महिलांमध्ये न्यूनगंड येतो व परिणामी, त्यांच्याच नैराश्यदेखील येत असल्याचं पाहायला मिळतं.  म्हणूनच, ही समस्या ओढावणारा पीसीओडी म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात.
पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. पीसीओएस एक हार्मोनल समस्या आहे. यात महिलांच्या शरीरात पुरूष हार्मोनची पातळी वाढते. अशा स्थितीत गर्भधारणेवर परिणाम होतो. परिणामी भविष्यात वंधत्वाच्या समस्येलाही तोंड दयावे लागू शकत. प्रजननक्षमतेवर परिणाम होण्याची अनेक कारणे आहेत. यातील एक मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा. शरीरातील चरबीमुळे बीजफलनाची शक्यता कमी होते. त्यामुळे लठ्ठ स्त्रियांना गर्भधारणा होत नसल्यास अतिरिक्त वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. शरीराचे वजन आणि अतिरिक्त चरबी किंवा मेद वितरण या गोष्टींचा परिणाम गर्भधारणेवर होत असतो.

हेही वाचा : ovarian cancer टाळण्यासाठी महिलांनी जीवनशैलीत करा ४ महत्त्वाचे बदल 

दरम्यान, पीसीओडी ही समस्या काही अंशी गंभीर जरी असली तरीदेखील त्यावर उपायदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे पीसीओडीचं निदान काळजी करण्याचं कारण नाही. सतत याच गोष्टीचा विचार करत राहिल्यास त्याचा परिणाम शरीरावरदेखील होतो. त्यामुळे सतत एकाच गोष्टीचा विचार करण्यासापेक्षा थेट डॉक्टरांशी याविषयी चर्चा करा.

(लेखिका डॉ. अपर्णा गोविल भास्कर या मुंबईतील अपोलो रुग्णालयात बॅरिअँटिक अँण्ड लेप्रोस्कोपिक सर्जन आहेत.)