लाइफस्टाइल कोच : ज्येष्ठांसाठी आरोग्यमंत्र

डॉ. मनीषा बंदिष्टी
Tuesday, 29 September 2020

ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीसाठी हितकारक असणारे जीवनशैलीतले काही बदल आपण आज बघणार आहोत. जवळच्या व्यक्ती, करिअर आणि स्वातंत्र्य या गोष्टी दुरावल्यानं या व्यक्ती आधीच भावनिकदृष्ट्या खचलेल्या असतात. दुसरीकडं त्यांचं शरीर तरुणांइतकं बळकट आणि ऊर्जेनं परिपूर्ण नसतं. त्यामुळं सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची काळजी खासकरून घ्यायला हवी.

ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीसाठी हितकारक असणारे जीवनशैलीतले काही बदल आपण आज बघणार आहोत. जवळच्या व्यक्ती, करिअर आणि स्वातंत्र्य या गोष्टी दुरावल्यानं या व्यक्ती आधीच भावनिकदृष्ट्या खचलेल्या असतात. दुसरीकडं त्यांचं शरीर तरुणांइतकं बळकट आणि ऊर्जेनं परिपूर्ण नसतं. त्यामुळं सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची काळजी खासकरून घ्यायला हवी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोज व्यायाम करा
व्यायामामुळं आपली प्रतिकारशक्ती एकूणच वाढत असते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती हा अगदी कळीचा मुद्दा असल्यामुळं त्यांनी त्याबाबत काही तडजोड करता कामा नये. 

1) व्यायामामुळं वजन मेंटेन होतं आणि अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. 
2) पेशींना ऑक्सिजन आणि पोषकद्रव्यांचा चांगला पुरवठा होतो आणि शरीराच्या वेगवेगळ्या यंत्रणांचं आरोग्य वाढतं. 
3) पडणं आणि जखमी होणं या घटनाही कमी होतात. 

पोषणदृष्ट्या ‘फिट’ बना
आहाराबाबतच्या चांगल्या सवयी असण्याची कधी नव्हे इतकी गरज सध्या निर्माण झाली आहे. मात्र, जसजसं वय वाढतं, तसे तुमच्यात काही बदल होतात, चयापचयाची प्रक्रिया मंदावते; तसंच वास आणि चव याबाबतच्या संवेदना कमी होतात. याचा तुमच्या आहारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं या सगळ्या मर्यादा मान्य करूनही पोषणाबाबत जास्तीत जास्त जागरूक राहण्याची गरज आहे.

1) नियमित अंतरानं; पण कमी प्रमाणात खात राहा. 
2) नट्स, फळं, पालेभाज्या, सीड्स, नाचणी (रगी), काळे चणे, बाजरी (पर्ल मिलेट), राजगिरा, आवळा यांसारखे पोषकद्रव्यं असलेले पदार्थ आहारात ठेवा. 
3) ब्रेड, साखर असलेले ज्युसेस, पास्ता, खूप बटर इत्यादी गोष्टी टाळा.
 

भावनिकदृष्ट्या स्थिर राहा
वार्धक्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी ध्यानधारणा ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच मदत करू शकते. ध्यानधारणा मेंदूतल्या स्मृती केंद्रांना ‘स्टिम्युलेट’ करते. ताण कमी करण्यासाठीचं ध्यानधारणा हे अतिशय उपयुक्त आणि प्रभावी माध्यम आहे. नकारात्मक विचार आणि भावना यांचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी शरीर आणि मन यांच्यातला समन्वय दृढ करणारं हे शास्त्र आहे.

1) ध्यानधारणेमुळं मूड आणि भावना यांच्यात सुधारणा होते. 
2) स्मृती सुधारते. 
3) रिलॅक्सेशन आणि मानसिक शांती वाढते.
 

‘वय ही केवळ एक संख्या आहे,’ असं म्हटलं जातं; मात्र तुम्ही प्रयत्न केलेत आणि तुमच्या आरोग्याबाबत जागरूकता बाळगली तरच ते सिद्ध होते, हेही लक्षात ठेवा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr manisha bandisthi on lifestyle coach