माझा फिटनेस : देह हेच मंदिर...

नेहा खान, अभिनेत्री
Tuesday, 5 May 2020

आपले शरीर सुंदर आहे. त्यामध्ये ऊर्जा आणि आनंद पाहिजे. कारण, शरीर मंदिराप्रमाणे असते आणि आपण पुजाऱ्याप्रमाणे त्याची पूजा करायला हवी. चांगले खाणे, नियमित व्यायाम आणि वेळेवर झोप घेतल्यामुळे हे शक्य होते. मी आरोग्य चांगले राहाण्यासाठी सर्व नियम पाळते, तसेच माझे दररोजचे रूटीन ठरलेले असते. त्यामध्ये मी कधीच खंड पडू देत नाही. मी नियमितपणे सकाळीच उठते. त्यानंतर कमीत कमी एक लिटर पाणी पिते. त्यानंतर सूर्यनमस्कार, कपालभाती, प्राणायामाचे प्रकार करते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शारीरिक आरोग्य सांभाळून आहार चांगला घेते. माझा नाश्ता भरपेट असतो. सकाळचे जेवण हलके असते. त्यामध्ये तेलाचे प्रमाण कमी असते. सलाड भरपूर खाते. त्याचप्रमाणे वेळेवर आणि पुरेशी झोप घेते. हाच माझ्या आरोग्याचा गुरुमंत्र आहे. मी सिझनल फळे भरपूर खाते. प्रत्येक फळामध्ये वेगवेगळी जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे सर्व फळांचा आस्वाद घेतला पाहिजे. मी दररोज सकाळी एक सफरचंद खाते. त्यामुळे मला दिवसभर ऊर्जा मिळते. वर्कआऊट करण्यापूर्वी मी केळी खाते. त्यात खूप कॅलरीज असतात. त्यामुळे मी चांगल्या प्रकारे वर्कआउट करू शकते. 

संत्री आणि अननस वर्कआउटनंतर खाते. सायंकाळी लेमन ग्रीन टी आणि द्राक्षे खाते. मात्र, सायंकाळी पाचनंतर फळे खात नाही. कारण, त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. रात्रीच्या जेवणात अंडी, चिकन वा भाजीपाला यांचा समावेश असतो. दिवसभरात पाच ते सहा लिटर पाणी हमखास पिते. माझे वडील पहिलवान असून, मी त्यांना फॉलो करते. तेच माझे फिटनेस मॉडेल आहेत.

मी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी योगा आणि स्वामिंग करते. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी वेट ट्रेनिंग, कर्डिओ आणि नृत्य करते. 

मी मनःशांतीसाठी ध्यानधारणा करते. योगा, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार माझ्या मानसिक विकासासाठी उपयोगी पडतो..
(शब्दांकन - अरुण सुर्वे)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article neha khan on health fitness