इनर इंजिनिअरिंग : चांगले, वाईट नको; फक्त मौन हवे!

Sadguru
Sadguru

असे लोक होऊन गेले, ज्यांनी लोकांना चांगुलपणा शिकवला. आणि असेही लोक होऊन गेले, ज्यांनी लोकांना वाईट गोष्टी शिकवल्या. त्याचबरोबर असे लोक देखील होऊन गेले, ज्यांनी चांगले आणि वाईट, या दोन्हींचा नाश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले; जेणेकरून जीवन हे चांगुलपणाच्या तत्त्वांनुसार नव्हे, तर ते जसे आहे तसेच असू शकेल. आणि खरं पाहता तेव्हाच आतून मौन असणे म्हणजे काय कळेल. चांगले आणि वाईट लोक शांती अनुभवू शकत नाहीत. जे लोक जीवन प्रक्रियेकडे एकाग्रतेने लक्ष देऊन पाहतात, तेच खरोखर शांत राहू शकतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मौन म्हणजे तुमच्या आत स्वतःचा असा कोणताच वैयक्तिक कारभार चाललेला नाही. मौनाचा अर्थ मी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकत नाही किंवा सूर्योदयाचा आनंद लुटू शकत नाही. शांत असणे म्हणजे माझ्या मनातला हलकल्लोळ मी थांबवला आहे. तुमच्या आत चाललेला सगळा गोंगाट मूलभूतपणे सुरू झाला. कारण, तुम्ही अस्तित्वाची ‘हे’ आणि ‘ते’ म्हणून विभागणी केली. ‘हे’ आणि ‘ते’ असल्यावर शांत असणे शक्य नाही. फक्त ‘हे’ आणि ‘हे’ असते, तेव्हाच शांती नांदते.

चांगुलपणाची प्रत्येक कल्पना केवळ पूर्वग्रह वाढवते. एकदा आपण एखादी गोष्ट चांगली आणि दुसरी वाईट म्हणून शिक्कामोर्तब केल्यावर तुमचे आकलन पूर्णपणे विकृत होते. त्यातून स्वत:ला बाहेर काढणे अशक्य होऊन बसते. या द्वैताचा नाश करण्यासाठी आम्ही योग निर्माण केला; म्हणूनच योगाचा पहिला प्रवर्तक शिवशंकर विनाशक म्हणून ओळखला जातो. योगाचा मुख्य हेतू या सर्व गोष्टी नष्ट करणे आहे; ज्या सुरुवातीला फार विलक्षण वाटतात, पण खरे पाहता त्याच तुमच्या बंधनांचा आधार आहेत.

शिवशंकरानं योगविज्ञान उलगडून सांगितले. ते त्यांनी अनेक मार्गांनी शिकवले. एका स्तरावर त्यांनी म्हटले की, ते इतके जवळ आहे आणि त्यांनी पार्वतीला सांगितले, ‘‘तू फक्त माझ्या मांडीवर बस आणि तोच तुझ्यासाठी योग आहे.’’ स्त्रीला आपल्या मांडीवर बसवणे ही जणू पुरुषी युक्ती दिसते. पण, शिवशंकराने आपला अर्धा भाग काढून टाकला आणि पार्वतीला स्वतःचाच एक भाग म्हणून सामावून घेतले. तिने पुष्कळ वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘तू काळजी करू नको, तू फक्त इथे बसून राहा, एवढे पुरेसे आहे.’’ पण, इतर कुणाला त्यांनी अतिशय विस्तृत पद्धती आणि साधना शिकवल्या आणि सत्याबद्दल असे स्पष्टीकरण दिले, की जणूकाही ते दहा लाख मैल लांब आहे! शिवशंकर असे दोन्ही बाजूंनी बोलतात आणि हा त्यांच्या शिकवणुकीचा सर्वांत सुंदर भाग आहे. ते सत्याला संबोधित करत नाहीत, ते त्यांच्यासमोर बसलेल्या लोकांना उद्देशून सांगत आहेत. कारण, सत्याला संबोधित केले जाऊ शकत नाही आणि त्याची गरजही नाही. जगाने हीच मोठी चूक केली. त्यांनी सतत परम सत्याला संबोधित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कधीही लोकांना संबोधित केले नाही.

योगप्रणाली कधीच सरळ सत्याबाबत बोलत नाही. योग फक्त लोकांना संबोधित करतो. परम सत्याबद्दल तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. जो सध्या सीमित मर्यादांमध्ये अडकला आहे, त्याला संबोधित करणे गरजेचे आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com