
तुमची तार्किक विचारसरणी तुम्ही ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये राहता त्यावर घडवली जाते. तुम्ही डोक्यात विशिष्ट प्रकारची विचार प्रक्रिया आणि माहिती गोळा केल्यामुळे त्या चौकटीतूनच तुम्ही विचार करता. तुम्ही तार्किक मन म्हणता, ते दुसऱ्यांचे मन आहे, तुमचे नाही. आज तुम्ही एका प्रकारे विचार करता, परंतु उद्या वेगळ्याच प्रकारे विचार करता.
तुमची तार्किक विचारसरणी तुम्ही ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये राहता त्यावर घडवली जाते. तुम्ही डोक्यात विशिष्ट प्रकारची विचार प्रक्रिया आणि माहिती गोळा केल्यामुळे त्या चौकटीतूनच तुम्ही विचार करता. तुम्ही तार्किक मन म्हणता, ते दुसऱ्यांचे मन आहे, तुमचे नाही. आज तुम्ही एका प्रकारे विचार करता, परंतु उद्या वेगळ्याच प्रकारे विचार करता. आज तुम्ही एखाद्या गोष्टीची बाजू घेऊन वाद घालता, परंतु उद्या त्याच गोष्टीविरोधात. हे घडते कारण विचार खूप आभासी आहे. तुमचा विचार तुम्ही ज्या गोष्टींशी ओळख बांधली आहे त्याद्वारे प्रकट होतो. तुम्ही योगाशी ओळख बांधल्यास योगाच्या बाजूने युक्तिवाद कराल.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तुम्ही इतर कशाशीतरी ओळख बांधल्यास योगाविरूद्ध युक्तिवाद कराल. आणि दोन्ही वेळी तुम्ही खरोखर सत्याच्या बाजूने आहात, असा तुमचा दृढ विश्वास असतो. म्हणून हा विचार खूप फसवा आहे, कारण तो तुमचा नाही. मात्र, तुमच्या शरीर यंत्रणेत घडणारा अनुभव इतर कुणी निर्माण करू शकत नाही. ते सहज घडतं. म्हणून तुमच्या विचारांपेक्षा तुमच्या अनुभवांवर विश्वास ठेवणे अधिक हुशारीचे आहे. तुमच्या आत खरोखर अनुभवाला येते, ते इतर कोणामुळे प्रभावित नसते. हो, पण तुम्ही ते कल्पनांमधून निर्माण करत असल्यास ती गोष्ट वेगळी. तुम्ही इच्छुक असाल किंवा नाही, तुमच्या आत काही घडले, तर ते खरे आहे, नाही का?
अनुभव आणि विचार एकमेकांविरुद्ध असल्याचे दिसून येते, कारण तुमच्यातील अनुभवात्मक आयाम अस्तित्वातील तो पैलू उघडतो, जो तर्कसंगत नाही. मात्र, विचार केवळ त्या आयामात प्रवेश करतो, जो केवळ तर्कसंगत आहे. हे संपूर्ण अस्तित्व तुम्ही तर्काच्या चौकटीत बसवू शकता का? नाही. म्हणून बऱ्याच गोष्टी विरोधाभासी आहेत. काहीही केलं तरी तुम्ही ह्या जीवनाचा ठाव विचाराच्या माध्यमातून घेऊ शकत नाही. तुम्ही जितका जास्त विचार करता तितके अधिक तुम्ही जीवनापासून दूर जाता. तुम्ही एक विभक्त बेट बनता. तुम्ही जीवनाच्या सहवासात तेव्हाच असू शकता, जेव्हा तुम्हाला ते जाणवते आणि तुम्ही ते अनुभवू लागता. तुम्ही ‘विचार’ करत राहिल्यास जीवनापासून दूर जाल आणि सत्याचा ठाव घेण्याची शक्यता नष्ट कराल. तर मग, सत्यापासून दूर जाणे ही हुशारी आहे की मूर्खपणा?
समस्या ही आहे की, तार्किक मन तुम्हाला यावर विश्वास ठेवायला भाग पाडते, की तुम्ही सर्वकाही नाकारल्यास हुशार बनत आहात. तर्क वादविवाद जिंकतो म्हणून तो छान वाटतो, पण ते खरं नाही. आयुष्याचा हेतूच जीवन जगणे आणि त्याला जाणणे आहे. म्हणून तुमच्या आयुष्याच्या अनुभवात्मक पैलूत घडणारे तर्काहून कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचे आणि अधिक हुशारीचे आहे.
Edited By - Prashant Patil