
तुमच्या मानसिक स्थितीचा वास्तवाशी काही संबंध नाही. आत्ता या क्षणी तुम्ही जणू स्वर्गात असल्याची कल्पना करू शकता आणि काही काळ खूष होऊ शकता किंवा अचानक हा जणू नरक असल्याची कल्पना करू शकता आणि अतिशय छळलेले आणि भयभीत होऊ शकता. तुमच्या मनासोबत तुम्ही हे करू शकता, नाही का?
तुमच्या मानसिक स्थितीचा वास्तवाशी काही संबंध नाही. आत्ता या क्षणी तुम्ही जणू स्वर्गात असल्याची कल्पना करू शकता आणि काही काळ खूष होऊ शकता किंवा अचानक हा जणू नरक असल्याची कल्पना करू शकता आणि अतिशय छळलेले आणि भयभीत होऊ शकता. तुमच्या मनासोबत तुम्ही हे करू शकता, नाही का? पण, वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही; तर हेच आहे मनाचं स्वरूप. तुमच्या मनात तुम्हाला हवं तेव्हा, हवं ते निर्माण करू शकता. पण, या गोष्टी तुम्ही मनात निर्माण करत आहात ते अपघाती आणि योगायोगानं आहे, जाणीवपूर्वक नाही आणि तुम्हाला वाटतं तेच वास्तव आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
समजा, एखाद्या नाटकात तुम्ही एखादी भूमिका साकारत असाल आणि एका क्षणासाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीप्रती तुम्ही प्रेमळ होऊ शकता आणि नाटक संपलं की तो प्रेमबंध संपतो. तुमच्या मनाची सुद्धा तीच अवस्था आहे. तुमच्या मनात घडत असलेल्या बहुतेक गोष्टी अजाणतेपणे घडत आहेत आणि तुम्हाला वाटतं ती वास्तविकता आहे. हे काही वास्तव नाही, हा फक्त एक विशिष्ट प्रकारचा भ्रम आहे. तुम्ही सतत भ्रमात अडकलेले असताना तुम्हाला वास्तवाचा स्पर्श होणारच नाही. तुम्ही भ्रमाच्या उत्तम स्थितीत जाता, तर कधी वाईट भ्रमात गुरफटलेले असता. पण, वाईट भ्रमांपेक्षा चांगले भ्रम फार अपायकारक आहेत. कारण, तुम्ही वाईट भ्रमात असताना तुम्हाला त्यातून बाहेर पडावंसं वाटेल; असत्यातून बाहेर येण्याची उत्कट इच्छा तुमच्यात निर्माण होईल. पण, तुम्ही चांगल्या भ्रमात अडकल्यास त्यातून बाहेर पडण्याची इच्छाही तुमच्यात निर्माण होणार नाही. तुम्ही कायमचेच भ्रमात वावरत राहाल.
बहुतेक लोकांच्या बाबतीत मी हे पाहतो, त्यांच्या आयुष्याचा शेवटचा क्षण आल्यावर पार गोंधळून गेलेले दिसतात. त्यांचं आयुष्य आता संपलं, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. कारण, त्यांच्यासाठी ते कधी सुरू झालंच नव्हतं. त्यांचं संपूर्ण आयुष्य आभासी विश्वात वावरलं, सर्व प्रकारच्या विचारविश्वात घालवलं; पण जीवनाचा लवलेश नाही. कृपया लक्ष देऊन पाहा, ९० वेळ आपण फक्त आयुष्याबद्दल विचार करत असतो, आपण जीवन जगत नाही आहोत. नाही का? मृत्यू आल्यावर आपल्याजवळ काय असतं? मृत्यू येतो आणि आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपलं जीवन सार्थक वाटेल का? ते सार्थक असलं पाहिजे, नाही का? नाहीतर काय अर्थ आहे? आपण जीवन वास्तवात जगलो, तरच ते सार्थक होईल, भ्रमात जगून नाही!
Edited By - Prashant Patil