फिट है तो हिट है!

मनाली देव
Saturday, 28 November 2020

सेतुबंधासन हे शयन स्थितीतील म्हणजेच पाठीवर झोपून करण्याचे आसन आहे. आसनाची अंतिम स्थिती सेतूप्रमाणे दिसते; म्हणून त्यास सेतुबंधासन म्हणतात. योग्य मार्गदर्शनाखाली आसने केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. आसनांच्या जोडीला ध्यानधारणा, विविध व्यायामप्रकार, सात्त्विक आहार, ही जीवनशैली स्वीकारल्यास विविध आजारांपासून तुमची सुटका होते व सुदृढ आयुष्य जगता येते, आयुष्याचा आनंद घेता येतो.

सेतुबंधासन हे शयन स्थितीतील म्हणजेच पाठीवर झोपून करण्याचे आसन आहे. आसनाची अंतिम स्थिती सेतूप्रमाणे दिसते; म्हणून त्यास सेतुबंधासन म्हणतात. योग्य मार्गदर्शनाखाली आसने केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. आसनांच्या जोडीला ध्यानधारणा, विविध व्यायामप्रकार, सात्त्विक आहार, ही जीवनशैली स्वीकारल्यास विविध आजारांपासून तुमची सुटका होते व सुदृढ आयुष्य जगता येते, आयुष्याचा आनंद घेता येतो. ‘बालकवीं’च्या कवितेतील ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे...’ अशी आनंदानुभूती आपल्याला घेता येते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आसनाचे फायदे 

 • पाठदुखी, कंबरदुखी कमी होते.
 • पाठीचा कणा सुदृढ, लवचीक होतो. 
 • संपूर्ण शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. 
 • थायरॉइडचा त्रास कमी होण्यास उपयुक्त. 
 • फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. 
 • अस्थमाचा त्रास कमी होण्यासाठी उपयुक्त.
 • श्‍वसनाचे त्रास कमी होतात. 
 • आत्मविश्‍वास वाढण्यास मदत होते. 
 • पचनसंस्था, उत्सर्जन संस्था यांचे कार्य सुधारते. 
 • पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होते. 
 • डिप्रेशन, मानसिक ताण कमी होतात. 
 • महिलांच्या विविध समस्यांवर उपयुक्त. 

मानसिक स्वास्थासाठी 

 • दररोज अनुलोम-विलोम प्राणायाम करावा, ध्यान करावे. 
 • रोज चालण्याचा व्यायाम करावा. 
 • आठवड्यातून एकदा तरी आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ काढावा, छंद जोपासावा.
 • सात्त्विक आहार घ्यावा. 

असे करा आसन 

 • पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावेत. 
 • पायाचे तळवे जमिनीला टेकवावेत. 
 • कंबर, पाठ जमिनीवरून वर उचलावेत. 
 • हाताने पाठीला, कंबरेला आधार द्यावा.
 • त्यानंतर हळूहळू एक-एक पाय पुढच्या बाजूला सरळ करावेत, गुडघे ताठ असावेत. 
 • डोक्याची मागची बाजू, खांदे, कोपर, दंड, दोन्ही तळपाय जमिनीला टेकलेले असावेत. 
 • याच्या अंतिम स्थितीमध्ये गळ्यावर छान दाब येतो. छाती, मांडी व पोटावर ताण येतो. पाठीवर दाब येतो.
 • १ ते दीड मिनिट स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. आसन सोडताना सावकाश उलट क्रमाने सोडावे.
 • त्यानंतर पवनमुक्तासन करावे, कंबरेवरचा दाब कमी होईल. गळ्यावरचा दाब कमी करण्यासाठी सरल मत्स्यासन करावे.

काय काळजी घ्याल.... 

 • मानेचा त्रास, स्पाँडिलिसिस, व्हर्टिगोचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये. 
 • पोटाची, पाठीची शस्त्रक्रिया झाली असल्यास सल्ला घेऊन आसन करावे; अन्यथा त्रास होऊ शकतो. 
 • जेवढा जमेल तेवढाच सराव करावा, आसन 
 • ओढून-ताणून करू नये.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write manali deo on health fit exercise yoga setubandhasan

Tags
टॉपिकस
Topic Tags: