माझा फिटनेस : लाभ म्युझिक थेरपीचा

Richa-Agnihotri
Richa-Agnihotri

आपल्याला फिटनेस आणि वेलनेस राखायलाच हवा. या दोन गोष्टी बरोबर असल्या, तर आपले जीवन सुखी आणि समृद्ध होते. मीही त्यादृष्टीने प्रयत्न करते. कोरोनाच्या काळात आरोग्य किती महत्त्वाचे असते, याची जाणीव प्रत्येकाला झालीच असेल. मी या सात ते आठ महिन्यांत मुलींचे कथकचे ऑनलाइन क्लास घेत होते. त्यातून माझाही व्यायाम झाला. हे करतानाच  झुंबा, योगासने व वर्कआउटही करत होते. खरे तर हे सर्व प्रकार म्युझिक थेरपीशी निगडित आहेत; त्याचा मला प्रत्येक वेळी फायदा झाला. वेगवेगळ्या गाण्यावर डान्स करणे, हीसुद्धा एक कला आहे. आपल्या शरीराला ऊर्जेची ज्या प्रमाणात गरज असते, त्या पद्धतीचे गाणे मी लावून मी नृत्य करते.

मी सकाळी साडेसातच्या आतच उठते. त्यानंतर जास्तीत जास्त वेळ आरोग्यसाठी देते. मी मालिकांचे चित्रीकरण सुरू असताना सेटवर आईने बनवलेले जेवण घेऊन जात होते. कारण, घरचे जेवण हेल्दी असते. त्यात न्यूट्रिशियन असतात. बाहेरच्या जेवणात वेगवेगळे पदार्थ मिक्स केलेले असतात. खरेतर बाहेरचे खाणे किंवा जंक फूड खाणे हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे मी सेटवरच कधीच खाल्ले नाही. लॉकडाउनच्या कालावधीत मी नवनवीन पदार्थ बनवायला शिकले. सॅलडचे वेगवेगळे प्रकार मीच तयार केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले. माझ्या आहारामध्ये पोळी, भाजी आणि भाकरीचा समावेश असतो. भात असल्यास फक्त वरण-भात किंवा दही-भातच खाते. मला पिझ्झा आवडतो; पण तो कधीच बाहेरून विकत आणत नाही. तो घरीच बनवते. त्यातून जास्तीत जास्त भाज्या आपल्या शरीरात जातात. दिवसभरात चार लीटर पाणी हमखास पिते. हे करतानाच चेहऱ्याचे सौंदर्य फुलवण्याचा प्रयत्नही मी केला आहे. त्यासाठी हेल्दीच खाते. रात्री अकराच्या आतच झोपते आणि सकाळी लवकर उठते.

‘घाडगे अँड सून’ या मालिकेत मी कियाराची भूमिका साकारली. त्याचबरोबर संतोष कोल्हे यांच्या आगामी ‘सलाते’ या चित्रपटातही अभिनय केला. न्यूयॉर्क अॅकॅडमीतून ‘अॅक्टिंग फाॅर फिल्म’चा कोर्सही केला. लॉकडाउनमध्ये माझा वाढदिवस होता. त्याचदिवशी मला एका जाहिरातीत भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर आणखी दोन जाहिराती केल्या. मी ‘डाबर’, ‘गोल्डजिम’ची जाहिरात केली. त्याचबरोबर सागरिका म्युझिकचा ‘या घडीला’ हा व्हिडिओ अल्बम शूट केला. पुष्कर जोगबरोबर एका प्रोजेक्टमध्ये नृत्यही केले. आगामी काळातही मला वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये विविधांगी भूमिका साकारायच्या आहेत. मी लॉकडाउनच्या कालावधीत होळी, पाडवा, दिवाळी हे सण आनंदात साजरे केले. त्याचबरोबर ख्रिसमसही साजरा करताना मी माझे पूर्ण घरच सजवले. त्यामध्ये क्रिएटिव्ह गोष्टी केल्या. प्रत्येकाने आपल्याला आनंद होईल, अशा गोष्टींवर प्रामुख्याने भर द्यावा. त्यातून तुमचे आरोग्यही सुधारेल.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com