esakal | पोटातील गॅसपासून तर मधुमेहापर्यंत रामबाण उपाय म्हणजे चिमूटभर हिंग

बोलून बातमी शोधा

asafoetida
पोटातील गॅसपासून तर मधुमेहापर्यंत रामबाण उपाय म्हणजे चिमूटभर हिंग
sakal_logo
By
टीम ई सकाळ

आपण पोटातील गॅस आणि पोटाच्या इतर समस्यांमुळे त्रस्त असाल आणि त्यावर घरगुती उपचार शोधत असाल तर आपल्याच स्वयंपाकघरात आपआपल्याला अनेक घटक मिळतात. त्यामुळे अपचनापासून कायमची सुटका होऊ शकते. त्यापैकीच असणारा पदार्थ म्हणजे हिंग. हिंग केवळ पदार्थांची चवच वाढवत नाही, तर ते आरोग्यासाठी लाभदायक आहे. हिंगाचे बरेच आरोग्यदायी फायदे आहे. या मसाल्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या स्नायूंना आराम मिळतो.

पचन सुधारते

हिंग आपल्याला पचनासंबंधीच्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत करते. हिंग सेवन केल्यास आपल्या पाचन तंत्रातील सर्व हानिकारक विष बाहेर टाकण्यास मदत होते आणि अपचन सारख्या समस्या उद्भवत नाही. हे पाचक प्रक्रियेस नियमित करते आणि पोटाची पीएच पातळी परत आणते.

वजन कमी करण्यास मदत करते

हिंग तुमची चयापचय वाढविण्यात मदत करते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. हिंगाचे पाणी पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता. हे आपल्या शरीराच्या खराब कोलेस्ट्रॉलवर देखील नियंत्रण ठेवते आणि यामुळे आपल्या हृदयावर परिणाम होऊ देत नाही.

कर्करोगाला प्रतिबंधित करते -

हिंग एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट आहे आणि नियमितपणे त्याचे सेवन केल्यास ते आपल्या शरीराच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते. हे पुढे कर्करोगापासून तुमचे संरक्षण करते

थंडीपासून बचाव करते -

आपण हिवाळ्यात खरोखर जोरदार सर्दी होत असल्यास हिंग पाणी प्या. हे श्वसनाच्या समस्यांवर रामबाण उपाय असून सर्दी होण्यापासून रोखते.

डोकेदुखी कमी करते

हिंगाचे दाहक गुणधर्म आपल्याला डोकेदुखीचा सामना करण्यास मदत करतात. यामुळे तुमच्या डोक्यातील रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ कमी होते. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी थोडेसे हिंग पाणी प्या.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)