पाठदुखी, किडनीच्या दुखण्यात फरक काय? या ८ टीप्स वाचा!

पाठदुखी आणि किडनी दुखण्‍याच्या लक्षणांमध्ये फरक असतो
Kidney Pain vs Back Pain
Kidney Pain vs Back Pain

प्रत्येक व्यक्तीला कधीना कधी शरीराची दुखणी सहन करावी लागतात. जेव्हा एखाद्याची कंबर दुखते तेव्हा ती पाठदुखी असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी आरोग्यावर परिणाम होतात. पण हे दुखणे किडनीचे म्हणजेच मूत्रपिंडाचेही असू शकते. पण बरेचदा यातला फरक लक्षात येत नाही. किडनीशी संबंधित समस्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी १० मार्च रोजी किडनी दिन साजरा केला जातो. पाठदुखी आणि किडनी दुखण्‍याची लक्षणांमध्ये फरक असतो. तो कसा हे समजून घेणे गरजेचे आहे.

Kidney Pain vs Back Pain
World Kidney Day 2022: तुम्ही दिवसातून ७-८ वेळा लघवीला जाता ? असू शकतात ही लक्षणे

पाठदुखी आणि किडनीचे दुखणे यातील फरक (Kidney Pain vs Back Pain)

१) जर एखाद्या व्यक्तीला पाठीच्या खालच्या भागात दुखत असेल, तसेच पोटातही हलके दुखत असेल तर ते मूत्रपिंडाच्या समस्येचे लक्षण असू शकते. तसेच, जर एखाद्या व्यक्तीला पाठदुखी असेल तर ते दुखणे फक्त पाठीपर्यंतच मर्यादित राहते.

२) जर एखाद्या व्यक्तीला पाठीच्या खालच्या भागात दुखत असेल पण पोटात दुखत नसेल तर ते मूत्रपिंडाच्या दुखण्याचं लक्षण असतेच असे नाही. कदाचित स्नायू कडक झाल्यामुळे किंवा काही दुखापतीमुळे वेदना होऊ शकतात.

Kidney Pain vs Back Pain
लघवीच्या रंगावरून समजतात आरोग्याच्या समस्या! आताच व्हा सतर्क

३) जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मुत्रपिंडात दुखते तेव्हा ते कमी प्रमाणात जाणवते. तर पाठदुखीचा मोठ्या भागावर परिणाम होऊ शकतो. पाठदुखी असल्यास एखाद्या व्यक्तीला तीव्र वेदना जाणवत नाहीत पण, मूत्रपिंडात वेदना होतात तेव्हा त्या व्यक्तीला तीव्र वेदना जाणवतात, अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

४) जर एखाद्या व्यक्तीला मूत्रपिंडाचा त्रास झाला असेल तर तो सतत किंवा कमी- जास्त असू शकतो, पण अशावेळी वेदना सतत होत असतात. तर पाठदुखी आपोआप निघून जाते. पाठीच्या स्नायू दुखणे आपोआप बरे होऊ शकते. मात्र पाठीत काही दुखापत किंवा गंभीर समस्या असल्यास त्या व्यक्तीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

Kidney Pain vs Back Pain
सकाळी Blood Sugar Lavel किती असावी? जाणून घ्या

५) जर एखाद्या व्यक्तीला फक्त एका बाजूला वेदना होत असेल तर ही वेदना मूत्रपिंडाची वेदना असू शकते. जर तुम्ही वजन किंवा जड सामान उचलले असेल तर दोन्ही भागांमध्ये वेदना होते. मानेच्या खालच्या भागात दुखणे हेही पाठदुखीच्या लक्षणांपैकी एक आहे.

६) जर नितंब दुखत असेल किंवा पाय सुन्न वाटत असतील तर तेही पाठदुखीचे लक्षण असू शकते. पायांच्या नसांमध्ये कमकुवतपणा आल्यामुळे असे होते. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Kidney Pain vs Back Pain
गायीचं दूध प्यायल्याने कोरोनापासून बचाव शक्य, अभ्यासात स्पष्ट

७) पाठीच्या वरच्या भागात दुखणे ही देखील पाठदुखी असते. पाठीच्या खालच्या भागात मूत्रपिंडाचा त्रास जाणवू शकतो.

८) लघवी करताना वेदना जाणवत असतील तर ते मूत्रपिंडाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. कारण किडनी हा यूटी अर्थात मूत्रमार्गाचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे लघवी करताना वेदना जाणवतात. तसेच लघवी करताना रक्तस्त्राव, वेदना होत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण, हे किडनी स्टोनच्या लक्षणांपैकी एक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com