esakal | 'बकासन'मुळे शरीराला मिळतात चमत्कारी फायदे! पण ही घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

bakasan

'बकासन'मुळे शरीराला मिळतात चमत्कारी फायदे! पण ही घ्या काळजी

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

जर दररोज आसन केल्यास शरीर तंदुरुस्त आणि क्रियाशील बनते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बकासनविषयी. बकासन म्हणजे बक आणि आसन. बकचा अर्थ होतो सारस ज्याला बगळाही म्हटले जाते. इंग्रजीत क्रेन पोज किंवा क्रो पाॅजच्या नावानेही ओळखले जाते. हे आसन करताना व्यक्ती बगळ्यासमान होतो. याच कारणामुळे याला बकासन असे म्हटले जाते.

१. बकासन करण्याची पद्धत

सर्वप्रथम जमिनीवर मॅट टाका आणि दोन्ही पाय दुमडून बसा. आता तुमचे दोन्ही हात पुढे करा आणि पंजांवर वजन सोडा. लक्षात ठेवा दोन्ही हातांदरम्यान थोडासा गॅप राहायला हवा. पार्श्वभाग उचला आणि पाय थोडेसे दुमडून दोन्ही हातांवर वजन द्या. आता तुमच्या पायाच्या टाचा जमिनीवर जोडताना गुडघ्यांना हलक्याने दुमडा. लक्षात ठेवा तुमचे हात आताही जमिनीवर असायला हवे आणि त्यामध्ये गॅप असायला हवे. आता गुडघे कोपऱ्यांपर्यंत आणि आणि पार्श्वभाग उचला. आता आपल्या पार्श्वभागाच्या मदतीने कोपऱ्यावर गुडघे ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम डावा पाय उचला आणि त्यानंतर उजवा. आता दोन्ही पाय सरळ व्हायला हवेत. आपल्या क्षमतेनुसार या स्थिती राहावेत. त्यानंतर सर्वप्रथम उजवा पाय जमीनवर ठेवा आणि त्यानंतर डावा ठेवा. हे आसन थोडे कठीण आहे. अशा वेळेस सुरवातीला तज्ज्ञांची मदत घेऊ शकता.

बकासन करताना घ्यावयाची काळजी

- उच्च रक्तदाब असलेल्यांनी हे आसन करु नये.

- ज्या लोकांना हृदयसंबंधित त्रास होत असेल त्यांनी हे आसन करणे टाळावे.

- ज्यांना जास्त करुन खांद्यांचा त्रास होतो त्यांनीही हे आसन करु नये.

- हे आसन करताना संयम बाळगा आणि संतुलन ठेवा.

बकासन करण्याचे फायदे

- चेहऱ्याच्या मांसपेशी तंदुरुस्त होतात. त्याने चेहऱ्यावर तेज येते.

- जे हे आसन करतात त्यांना पोटाचे विकार कधीही होत नाहीत.

- हात, पायाच्या नाजूक मासपेशींना मजबूत करण्यासाठी तुम्ही हे आसन करु शकता.

- जर शरीरातील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही हे आसन करु शकता. शरीरही तंदुरुस्त होते.

loading image
go to top