अनेक आजारांवर भारी, आवळा ठरतोय गुणकारी!

अनेक आजारांवर भारी, आवळा ठरतोय गुणकारी!

सातारा : आवळा हे तुरट व आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे, हिरव्या रंगाचे अत्यंत औषधी फळ आहे. आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व प्राप्त आहे. आवळ्याचे झाड सुमारे २० ते २५ फुटापर्यंत लांब झारीय वृक्ष असून हे एशियाच्या व्यतिरिक्त युरोप आणि अफ्रिकामध्ये मिळते. याचे फळ हिरवे आणि गरयुक्त असते. स्वादामध्ये हे फळ तुरट आणि रुचकर असते. 

या आवळा वृक्षाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, साल राखाडी रंगाची, पाने चिंचेच्या पानांसारखी, परंतु काही मोठे आणि फुले पिवळ्या रंगाचे छोटे-छोटे असतात. फुलांच्या जागी गोल, चमकणारे, पिकल्यावर लाल रंगाचे, फळ लागतात जे आवळा नावाने ओळखले जाते. वाराणसीचा आवळा सगळ्यात चांगला समजला जातो. हे वृक्ष कार्तिकमध्ये बहरतो.

भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला प्रचंड महत्त्व आहे. आयुर्वेदातील औषधोपचार पद्धती गेली हजारो-लाखो वर्ष केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही जगभरात वापरली जाते. आयुर्वेद ही अशी औषधोपचार पद्धती आहे, ज्यामध्ये ते शरीरावर वाईट परिणाम जवळजवळ होतच नाही असे औषध सापडतात.

अनेक दुर्धर आजारांवर देखील आयुर्वेदाने आपली कमाल याआधीही दाखवली आहे. आयुर्वेदात सांगितलेले गुणकारी उपाय हे अनेकदा आपल्या घरात सहज उपलब्ध होऊ शकतात. आज आपण अशाच पोषणमूल्यांचा खजिना असलेल्या आवळ्याबाबतीत जाणून घेणार आहोत.

सर्दी, ताप, खोकला असे आजार शक्यतो पावसाळा आणि थंडीच्या वातावरणात प्रत्येकालाच होतात. यावर आवळ्याचा रस गुणकारी ठरतो. तोंडात येणारे पांढरे चट्टे हेदेखील आवळ्याच्या रसाच्या सेवनाने दूर होतात. उष्णतेने तोंड येण्याची समस्या होत असेल तरीदेखील आवळ्याचा रस गुणकारी ठरतो.

आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते. हृदयविकाराचा ज्यांना त्रास होतो अशा लोकांसाठी आवळ्याचा रस म्हणजे संजीवनीच जणू. हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी आवळ्याचा रस अवश्य प्यावा. त्यातील एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण आणि अमिनो ऍसिड यामुळे हृदयाला मजबुती प्राप्त होते.

अशुद्ध रक्ताची समस्यादेखील आवळ्याच्या रसाने दूर होते. रक्ताभिसरण व्यवस्थित करण्यासाठी आणि रक्त शुद्धीकरण करण्यासाठी आवळ्याच्या रसाचा वापर केला जातो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आवळ्याची मदत होते. आवळा तुरट लागतो आणि थोडासा आंबटही. यावरून आपल्याला त्यामध्ये विटामिन सी असेल असे वाटते. आवळ्यात विटामिन सी बरोबरच लोह कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण देखील अधिक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com