esakal | मुलतानी मातीसोबत 'ही' गोष्ट मिसळा; चेहरा होईल सुंदर
sakal

बोलून बातमी शोधा

मुलतानी मातीसोबत 'ही' गोष्ट मिसळा; चेहरा होईल सुंदर

तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स काढून टाकायच्या असतील तर मुलतानी मातीचा वापर जरूर करा.

मुलतानी मातीसोबत 'ही' गोष्ट मिसळा; चेहरा होईल सुंदर

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पुणे : पावसाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples) येणे ही एक सामान्य समस्या आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना वर्षानुवर्षे त्यांच्या चेहऱ्यावर (face) पिंपल्सचा त्रास असतो, जेव्हा ते पिंपल्स कमी होण्यासाठी प्रयत्न करूनही काही होत नसल्यामुळे सगळे करणं सोडून देतात. तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स काढून टाकायच्या असतील तर मुलतानी मातीचा (multani mati) वापर जरूर करा. (benefits of applying camphor with multani mati on the face)

हेही वाचा: तांदळाच्या पिठाने मिळवा सुंदर चेहरा; घरगुती उपाय

मुलतानी मातीसोबत कापूर लावा

जर तुमच्या चेहर्‍यावर पिंपल्स असतील तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मुलतानी माती आणि कापूर एकत्र करून बनवलेले पॅक लावा. कापूरमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे, जो संक्रमण बरे करतो. आणि स्किन बरे करण्यास मदत करते. तुम्ही हा पॅक हात आणि पायांचे रंग गोरे करण्यासाठी देखील वापरू शकता.

हेही वाचा: पिंपल्स आणि फोड यांच्यातील फरक माहित आहे का?

असे बनवा पॅक

- एका भांड्यात 2 चमचे मुलतानी माती घ्या

- कापूरचा एक तुकडा बारीक करून त्यात ठेवा.

- आता त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला आणि सर्व चांगले मिसळा.

- हे पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून पुसून घ्या.

- आता फेसपॅक सर्व चेहऱ्यावर लावा.

- 15 मिनिटांनंतर ते धुवून त्यानंतर मॉइश्चरायझर लावा.

हेही वाचा: पिंपल्स आलेल्या चेहऱ्यावर शेव्ह करताय? अशी घ्या काळजी

ही चूक कधीही करू नका

मुल्तानी मातीमध्ये लिंबाचा रस घालू नका. असे केल्यास चेहर्‍यावर खाज सुटू शकते. पिंपल्स होण्याचे कारणही हे होऊ शकते. यासह मुल्तानी मातीचा पॅक वापरताना ते पाण्याने धुवा आणि कोरडे झाल्यावर घासू नका. दुसरीकडे, मुलतानी माती स्किनला सुकवते, म्हणून ते धुल्यानंतर नक्कीच चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image