esakal | मोड आलेले हिरवे मुग ठेवतील तुम्हाला विविध आजारांपासून दूर 
sakal

बोलून बातमी शोधा

benefits of sprouts green mung bean

तुम्ही कोणतीही कडधान्य खा, पण आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत खास मोड आलेल्या हिरव्या मुगांबद्दल !

मोड आलेले हिरवे मुग ठेवतील तुम्हाला विविध आजारांपासून दूर 

sakal_logo
By
प्राजक्ता निपसे

होय, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खर आहे कि , मोड आलेले हिरवे मुग तुम्हाला विविध आजारापासून दूर ठेवते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात.

तुम्ही कोणतीही कडधान्य खा, पण आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत खास मोड आलेल्या हिरव्या मुगांबद्दल ! मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत, जे मुळापासून नष्ट होतात. चला तर जाणून घेऊया कधीही न ऐकलेल्या ना वाचलेल्या मोड आलेल्या हिरव्या मुगांच्या फायद्यांबद्दल!

हार्ट डिसीजपासून संरक्षण देते 
हृदय रोगांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही मोड आलेले मुग आवर्जुन खाल्ले पाहिजेत, याचा शरीरावर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येतो,यामागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार मुगांमध्ये हृदयाला होणाऱ्या गंभीर आजारांपासून आपला बचाव करण्याचा विशेष गुणधर्म असतो. 

डायबेटीस कंट्रोलमधें येतो  
मोड आलेल्या मुग डाळीचे सेवन मधुमेहाच्या रूग्णासाठी मधुमेहावरील एखाद्या औषधासारखे काम करते. मधुमेहापासून होणाऱ्या धोक्यांपासून आपल्या शरीराचा बचाव करता यावा यासाठी मोड आलेल्या मुगांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म असतो. 

वजनावर कंट्रोल ठेवण्यासाठी 
वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता.

संपादन - सुस्मिता वडतिले  

loading image