प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे? आहारात करा या पालेभाज्या आणि फळांचा सामावेश

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 23 September 2020

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे दिवसेंदिवस देशभरात भितीचं वातावरण पसरत आहे. कोरोना काळात जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कोरोनाला घाबरण्याचं काहीच कारण नाही.

पुणे: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे दिवसेंदिवस देशभरात भितीचं वातावरण पसरत आहे. कोरोना काळात जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कोरोनाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण तुमची रोगप्रतिकारक शक्ती क्षमता उत्तम असेल तर कोणतंही इनफेक्शन तुम्हाला लगेच होत नाही. यामुळे आता सर्वांनी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे.

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खाण्यावर भर दिला पाहिजे. पालेभाज्या आणि फळांचे सेवन तुमची प्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करते, अशी असल्याची माहिती myUpcharच्या डॉ. आकांक्षा मिश्रा यांनी दिली आहे. पुढे बोलताना मिश्रा यांनी कोणत्या पालेभाज्या आणि फळं खाल्ली पाहिजे याबद्दलची माहिती दिली.

1. आवळा-
कोणत्याही रोगावर मात करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याभर दिला पाहिजे. आवळ्यात व्हिटॅमिन सी चं प्रमाण चांगलं असल्याने आपली रोगप्रतिकार क्षमता उत्तम राहण्यास मदत होते. अर्धा कप पाण्यामध्ये आवळयाचा रस घालून दररोज प्यायलं पाहिजे, यामुळे आपल्या रोगप्रतिकार क्षमता मजबूत होण्यास मदत होते.

वाचा सविस्तर- कोरोनाला हरवायचंय? मग नियमित आहारात असा करा लसूण आणि हळदीचा वापर

संत्री-
 संत्री आंबट असल्याने त्यात 'व्हिटॅमिन सी'चं प्रमाण चांगलं असतं. यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत राहण्यास मदत होते. तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढलं तर शरीरातील पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढतं. पांढऱ्या पेशी या वेगवेगळ्या जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यासाठी मदत करतात. याबरोबरच संत्र्यामध्ये भरपूर पॉलिफेनॉल असतं जे आपलं विषाणूजन्य संक्रमणापासून बचाव करतं. इतकेच नाही तर व्हिटॅमिन ए, फोलेट आणि तांबे यासारख्या पोषकद्रव्ये देखील रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात. 

पपई-
पपईमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने ते पांढर्‍या रक्त पेशी वाढविण्यास मदत करतं. तसेच पपईमध्ये इतर घटकही असतात जी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात. यामध्ये प्रथिने, अँटीऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे A आणि E यांचा सामावेश होतो. रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहण्यासाठी आपल्या शरीराला जीवनसत्त्वे A आणि E दोन्हींची आवश्यक असते. पपई ही सर्दी, फ्लू आणि खोकला यांचा त्रासावर गुणकारी मानली जाते. 

कोरोना संक्रमणाची भीती वाटतेय? अशा करा भाज्या स्वच्छ!... वाचा सविस्तर

शिमला मिर्ची-
शिमला मिर्चीत आपल्या शरीराला आवश्यक असणारे अनेक गुणकारी घटक असतात. शिमला मिर्चीत व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्स प्रमाण भरपूर असतं. तज्ज्ञांच्या मते पपई खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते. तसेच यात असलेल्या अँटिऑक्सिडेंट्सच्या चांगल्या प्रमाणामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणाही कमी होतो.

पेरू-
पेरूमध्ये पोटॅशियम आणि फायबरचं प्रमाण चांगलं असतं. पेरूच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी सुधारते तसेच याच्या सेवनाचा फायदा हृदयाच्या आरोग्यालाही चांगला आहे. फ्लू आणि डेंग्यू ताप असल्यास पेरू खाल्ल्याने फायदा होतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to boost immunity include these vegetables and fruits in your diet