'ब्रेन फॉग' नेमकं काय आहे? कोरोनातून बरे झालेल्यांना होतोय याचा त्रास

कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचार घेत असताना रुग्णांच्या शरीरात अनेक बदल होतात
brain fog
brain fogbrain fog

औरंगाबाद: सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. तर दुसरीकडे दिलासा देणारी बाब म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. रिकव्हरी रेटही दिवसेंदिवस वाढत आहे. बरे होऊन घरी आलेल्या रुग्णांनीही काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ करत आहेत. कारण कोरोनातून बरे झाल्यावर काही रुग्णांना मानसिक त्रास, दमलेले असणे असा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचार घेत असताना रुग्णांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामध्ये 'सोशल स्टिग्मा' रुग्णांवर परिणाम करत आहे. याला 'ब्रेन फॉग (Brain Fog)' असंही म्हणतात. यामध्ये घाबरण्यासारखे काहीच नाहीये. जेवढा वेगळा हा शब्द आहे तेवढा तो भयानक नाही. या आजारावर तुम्ही कोणतीही औषधे न घेता मात करू शकता. यावरील उपचार सोपे आहेत तरीही तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तर चांगले. तर चला मग ब्रेन फॉगबद्दल अधिक जाणून घेऊया.

कोरोनातून सावरलेल्या रुग्णांत हा आजार दिसत आहे
कोरोनातून सावरलेल्या रुग्णांत हा आजार दिसत आहे

कोरोना आणि ब्रेन फॉगमध्ये काय फरक आहे?

ब्रेन फॉग हा कोणालाही होऊ शकतो. हा मेडिकल किंवा वैज्ञानिक शब्द नाही तर लोकांनी वापरलेला शब्द आहे. यामध्ये काय होतंय ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. कंटाळा, काम करण्यात मन न लागणे, एकाग्र होण्यास अडथळा येणे, बऱ्याच गोष्टी विसरणे, समजा रात्री दोन वाजता उठवून तुम्हाला कोणीतरी काम सांगतंय असं वाटणे, जेट लॅट झाल्यासारखे वाटणे. आता बरेच कोरोनातून सावरल्यानंतर ब्रेन फॉगची तक्रार करत आहेत. या आजाराबद्दल मागील वर्षापासूनच चर्चा होत आहे. यामध्ये मेंदूच्या 'कॉग्निटिव्ह फंक्शन'वर प्रभाव पडत असल्याचे दिसते. जसे की गोष्टी आठवण्यास त्रास होणे, विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे, भावनांचे संतुलन बिघडणे.

फोर्टिस मेंटल हेल्थ प्रोग्रामचे संचालक मानसोपचारतज्ञ डॉ. समीर पारीक याचं ब्रेन फॉगबद्दल सांगतात, 'समजा एखाद्याल ४-५ दिवस एका अंधाऱ्या खोलीत ठेवले आणि नंतर तो बाहेर आल्यानंतर त्याला जसं वाटेल तसेच ब्रेन फॉगमध्ये रुग्णांना जाणवते'. डॉ. पारीक पुढे बोलताना सांगतात की, 'कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णांना विलगीकरणातर रहावे लागल्याने ब्रेन फॉग दिसून येत आहे. पण यात घाबरण्यासारखीही काहीच गोष्ट नाही'.

ब्रेन फॉग झाला असेल तर काय करावं-

जर तुम्हाला ब्रेन फॉगची काही लक्षणे दिसत असतील तर पहिलांदा डॉक्टारांचा सल्ला घ्या. दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे कार्यरत डॉ. संजीव स्पष्ट सांगतात की, ब्रेन फॉग कोणत्याही एका कारणामुळे होत नाही. हे शरीर आणि वातावरणाच्या सभोवतालच्या घटनांचा परिणाम असतो. याची चाचणी अगदी सोपी आहे, MMSE नावाचे एक स्केल आहे, ज्यास मिनी मेंटल स्टेट एक्झामिनेशन स्केल असे म्हणतात. हे ३० पाईंचचे प्रमाण आहे, ज्याअंतर्गत काही प्रश्न विचारले जातात आणि उत्तरांच्या आधारावर क्रमांक दिले जातात आणि मानसिक स्थितीचे मूल्यांकन केले जाते.

या आजाराशी संबंधित सोशल स्टिग्मा त्रासदायक ठरतोय-

एम्सचे डॉ. संजीव पुढे असा दावा करतात की जगातील अनेक देशांमध्ये या आजाराचा अधिक प्रभाव आहे. याचे कारण तिथली निरक्षरता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. त्यांच्या मते, या आजाराशी संबंधित सोशल सिटग्मा लोकांच्या मनावर परिणाम करीत आहे.

ब्रेन फॉगवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.
ब्रेन फॉगवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.

ब्रेन फॉगवरील उपचार-

हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉ. अँड्र्यू बॅडसन आणि फोर्टिस मेंटल हेल्थ प्रोग्रामचे डॉ. समीर पारिक या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी अनेक उपचार सुचवतात.

१) व्यायाम करा. कमी प्रमाणात करा पण व्यायाम केल्यास खूप फायदा होतो. सुरुवातीला केवळ दोन ते तीन मिनिटांच्या व्यायामाने केली जाऊ शकते, नंतर ती वेळ वाढवता येते पण व्यायाम महत्त्वाचा ठरतो.

२) आपल्या आहातार फळे आणि भाज्या, ड्राय फ्रूट्स, मांस-मासे, मसूर आणि सोयाबीनचा समावेश असावा.

३) मद्यपान व इतर व्यसने टाळा.

४) व्यवस्थित झोप घ्या.

५) जास्तील जास्त लोकांमध्ये मिसळा. विविध कामात स्वतःला गुंतवून घ्या.

६) तुमच्या आवडीचे काम करा. उदा. पुस्तके वाचणे, सिनेमा पाहणे, गाणी ऐकणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com