esakal | कर्करोग टाळता येऊ शकतो! तो कसा वाचा | Cancer
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोग

कर्करोग टाळता येऊ शकतो! तो कसा वाचा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : कॅन्सर हे जगभरातील मृत्यूंपैकी एक सर्वांत प्रमुख कारण आहे. शरीरात विविध कारणांमुळे कर्करोगाच्या पेशी वाढतात आणि अनहेल्दी आहार हे त्यापैकी एक कारण आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान, लठ्ठपणा, अल्कोहोल आणि यूवी किरणांचा संपर्क यासोबतच काही इतरही घटक आहेत जे यास कारणीभूत ठरतात. आहारा संबंधित सवयी कर्करोगाचा धोका वाढवू किंवा कमी करू शकतात.

कोविड काळात लोकांनी आरोग्याकडे लक्ष देणे सुरू केले होते. परंतु, लॉकडाऊन संपताच परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी झाली आहे. प्रत्येक जण पूर्वीप्रमाणेच आधुनिक जीवनशैलीमध्ये गुंतला आहे. अनहेल्दी पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे लिवर, किडणी आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. वेळीच ओळखल्यास या रोगांवर उपचार केले जाऊ शकतात. जेणेकरून कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो.

कॅन्सर म्हणजे मरणाचे आमंत्रण असा समज लोकांनी पक्का डोक्यात बसून घेतलेला आहे. त्यामुळे पैशंट या रोगातून बाहेर निघत नाही. हेल्दी अन्नपदार्थ खाल तर तुम्हाला उत्साही वाटेल आणि कायम फिट राहाल. तुमच्या ताटामध्ये ट्रान्स फॅट आणि रिफाइंड पदार्थ जास्त असतील तर आळस येणे आणि आरोग्याच्या समस्या उद्भवणे सहाजिकच आहे.

हेही वाचा: उपराजधानी होतेय ‘सेक्स रॅकेट’चे केंद्र; ‘कॉन्ट्रॅक्ट’वर मुली शहरात

अल्कोहोल सिगरेट आणि तंबाखूचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. लठ्ठपणामुळे कुठेतरी कर्करोगाचा धोकाही वाढतो. जास्त वजन असलेल्या लोकांना टाइप-२ मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग आदी धोका जास्त असतो.

घरीच ताजे ताजे मांस-मटण शिजवा

कोणत्याही प्राण्याचे मांस स्मोक करून आणि मीठ लावून संरक्षित केलेले असतील तर ते आरोग्यासाठी अनहेल्दी असतात. या पदार्थांमुळे वजन वाढण्यापासून ते कर्करोगापर्यंत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. प्रक्रिया केलेल्या मांसापासून एक कंपाउंड किंवा संयुग तयार होते, जे कार्सिनोजेन्स असू शकते. यामुळे एखाद्या व्यक्तीला कोलोरेक्टल आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. हॉट डॉग, सलामी आणि सॉसेस सारख्या प्रक्रिया केलेल्या मांस खाण्याऐवजी घरीच ताजे ताजे मांस-मटण शिजवा.

हेही वाचा: नुसता दुधाचा चहा पिताय? जाणून घ्या होणारे नुकसान

याचे करा सेवन

 • कांदा आणि लसूण

 • भाज्या

 • आलं

 • हळद

 • पपई, किवी आणि संत्री

 • गाजर, आंबा आणि रताळं

 • द्राक्षे

 • टोमॅटो आणि टरबूज

 • डाळी आणि सोयाबीन

 • पालक

 • कडुआ

 • हिरव्या भाज्या

 • बेरी

 • स्ट्रॉबेरी

 • काळी रस्पबेरी

 • कमळ काकडी

 • ब्रोकोली

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image
go to top