कर्करोग : कारणे व उपचार

Cancer
Cancer

भारतात स्तनाचा कर्करोग, मौखिक कर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, पोटाचा कर्करोग हे जास्त प्रमाणात आढळून येतात.

एकीकडे भारताची आर्थिक स्तरावर प्रगती होत असताना दुसरीकडे जीवनशैलीशी निगडित आजारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते.ही स्थिती गंभीर जरी असली तरी अद्ययावत तंत्रज्ञान, कर्करोग तज्ञांची वाढती उपलब्धता, सुधारित परिणाम यांमुळे भारतात कर्करोग उपचार योग्य दिशेने प्रगती करत आहे, गरज आहे तर ती जागरूकतेची. ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो.यावर्षीची संकल्पना आय ॲम आय विल ही असून कर्करोगाचा बोजा कमी करण्यासाठी प्रत्येकामध्ये योगदान देण्याची क्षमता आहे, हे अधोरेखित करते.

कर्करोगामध्ये शरीरातील असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ होते. कर्करोगामध्ये ट्यूमर विकसित होण्याचे एक ठराविक स्वरूप असते आणि पूर्णपणे कर्करोग होण्याआधी विविध टप्प्यांतून प्रक्रिया जात असते. कर्करोग जर सुरुवातीच्या अवस्थेत असेल,तर प्रभावी उपचारांद्वारे त्यावर मात करता येते. कर्करोगावरील उपचार पद्धतीत भारतात आमूलाग्र बदल झाला आहे.टार्गेटेड थेरपीज, इम्युनो थेरपी व इतर नवीन उपचार पद्धतींमुळे वैयक्तिक उपचारांकडे आपण वाटचाल केली आहे. परंतु हे होत असताना उपचाराचा खर्च व आरोग्यसेवेच्या उपलब्धतेबाबत शहरात आणि ग्रामीण भागात असलेली असमता हे एक मोठे आव्हान आहे. त्यामध्ये तपासणी शिबिरे, मार्गदर्शन सत्रे, विविध उपक्रम, कर्करोगाशी यशस्वी लढा दिलेल्या रुग्णांचा मेळावा इत्यादी उपक्रम प्रभावी ठरतात.

खरंतर रेडिएशन थेरपी ही कर्करोग उपचाराचे महत्त्वाची पद्धती आहे आणि बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत रेडिएशन थेरपी शिवाय पर्याय नसतो. रेडिएशन थेरेपी मुख्यतः कर्करोगाच्या पेशींची होणारी वाढ थांबवण्याचे काम करते. रेडिएशन थेरपीचे मुख्य उद्दिष्ट हे कर्करोगाच्या पेशी नष्ट करणे व सामान्य पेशींशी कमीत कमी संपर्क करणे आहे. या उपचार पद्धतीमध्ये कुठलाही छेद न करता अवयवाचे कार्य राखते. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र प्रगतीमुळे कर्करोग बरे होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, हे समजणे गरजेचे आहे आणि जरी कर्करोग पुन्हा झाला तरी घाबरण्याचे कारण नाही. रेडिएशन मुळे स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकार होऊ नये किंवा टाळता यावे म्हणून ॲक्‍टिव्ह ब्रेथ कॉर्डिनेटर (एबीसी) हे सर्वांत प्रभावी तंत्रांपैकी एक आहे. गुदाशयाच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या रेडिएशन थेरपीमुळे इतर अवयवांवर होणारा प्रभाव टाळण्यासाठी प्रोन बेली हे तंत्र वापरले जाते.

श्वास रोखून धरणे आणि प्रोन बेली हे अभिनव तंत्र असून या पद्धती रुग्णांना रेडिएशन देताना खूप प्रभावी ठरतात. हे अगदी सोपे उपाय आहेत ज्यामुळे कर्करोग उपचारांमध्ये परिवर्तन झाले आहे आणि त्यामुळे मोठा बदल घडत आहे. छातीच्या डाव्या बाजूला ट्यूमर असणाऱ्या स्तनाचा कर्करोग रुग्णांमध्ये ही मोठी चिंतेची बाब राहिली आहे कारण अशा रुग्णांमध्ये रेडिएशन थेरपीचा हृदयावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

यावर उपाय म्हणून ॲक्‍टिव्ह ब्रेथ कॉर्डिनेटर (एबीसी) हे तंत्र वापरले जाते. जे रुग्ण कमीत कमी २० सेकंदांपर्यंत आपला श्वास रोखून धरू शकतात, फक्त असेच रुग्ण एबीसी तंत्रासाठी पात्र ठरू शकतात. यासाठी रेडिएशन थेरपी दरम्यान रुग्णांना कमीत कमी१० मिनिटे पोटावर झोपावे लागते. एबीसीमुळे रेडिएशनचा हृदयाला डोस हा एक चतुर्थांशने कमी होतो आणि रुग्णांना आराम मिळतो. या सर्व गोष्टी लक्षात घेता बरेचसे हॉस्पिटल्स व संस्था कर्करोगाशी लढा दिलेल्या रुग्णांचा व सध्याच्या रुग्णांचा सहाय्यक गट तयार करतात आणि या माध्यमातून अनेक उपक्रम आयोजित केले जातात. सुधारित परिणाम, प्रगत तंत्रज्ञान आणि कर्करोग तज्ञांची उपलब्धता, उपचारानंतर वाढलेला जगण्याचा दर यामुळे भारतातील कर्करोग चिकित्सा योग्य दिशेने वाटचाल करत आहे. मात्र देशात कर्करोगाच्या उपचाराच्या उपलब्धतेमधील असमानता दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.
- डॉ. शोना नाग (डायरेक्‍टर-ऑन्कोलॉजी, सह्याद्री हॉस्पिटल्स)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com