बदलत्या वातावरणात सर्दी, खोकला, तापाचा कहर

नागरिक झाले त्रस्त, गॅस्ट्रोचेही रुग्ण
बदलत्या वातावरणात सर्दी, खोकला, तापाचा कहर
बदलत्या वातावरणात सर्दी, खोकला, तापाचा कहर

जालना : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे इतर आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. सध्या शहरासह जिल्ह्यात सर्दी, खोकला, तापाने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय काही ठिकाणी गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा, तसेच तत्काळ कोरोना चाचणीही करावी असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण आटोक्यात आले आहेत. आज घडीला जिल्ह्यात कोरोनाचे केवळ दोन सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

मात्र, मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे चित्र आहे. कारण मागील काही दिवसांपासून इतर आजारांनी डोके वर काढले असून शहरासह जिल्ह्यात सर्दी, ताप, खोकला, अंग दुखीचे रुग्ण आढळून येत आहेत. विशेष म्हणजे सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे ही कोरोना संसर्गाची आहेत. त्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

शिवाय शहरात गॅस्ट्रोचे ही रुग्ण आढळून येत असल्याचे खासगी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात गॅस्ट्रोचे रुग्ण नाही, असे निर्वाळा देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर वातावरणामुळे आलेल्या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, सर्दी, खोकला, ताप, अंग दुखी असे लक्षणे असल्यावर दुखणे अंगावर न काढता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच कोरोना चाचणीही करावे, असे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.

''वातावरणात बदल झाल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु, कोरोना अद्यापि संपलेला नाही. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, अंग दुखी असलेल्या रुग्णांना अंगावर दुखणे न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शिवाय कोरोना चाचणी ही करून घ्यावी.''

-डॉ. अर्चना भोसलेजिल्हा शल्यचिकित्सक, जालना

''वातावरणात बदल झाल्याने सर्दी, ताप, खोकला असे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु, हा कोरोना संसर्ग नसला तरी रुग्णांना तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शिवाय शहरात गॅस्ट्रोचे ही रुग्ण आढळून आले आहेत.''

-डॉ. आशिष राठोड नवजीवन हॉस्पिटल, जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com