esakal | हेल्थ टिप्स - अपचनावर नियंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

indigestion

धकाधकीच्या जीवनात अपचन हा शब्द परवलीचा झाला आहे. अपचन वेगवेगळ्या कारणाने होऊ शकते. अपचन ही आरोग्यविषयक सामान्य समस्या आहे. अपचनाला दूर राखण्यासाठी काही गोष्टी आपणही करू शकतो. बदलत्या जीवनशैलीत थोडी काळजी घेतल्यास अपचनाच्या त्रासापासून सुटका करून घेता येईल. 

हेल्थ टिप्स - अपचनावर नियंत्रण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धकाधकीच्या जीवनात अपचन हा शब्द परवलीचा झाला आहे. अपचन वेगवेगळ्या कारणाने होऊ शकते. अपचन ही आरोग्यविषयक सामान्य समस्या आहे. अपचनाला दूर राखण्यासाठी काही गोष्टी आपणही करू शकतो. बदलत्या जीवनशैलीत थोडी काळजी घेतल्यास अपचनाच्या त्रासापासून सुटका करून घेता येईल. 

 • ठरावीक काळानंतर म्हणजे तीन-चार तासांच्या गॅपनंतर काहीतरी खावे, अन्यथा उपाशी राहण्याने पित्ताचा त्रास होतो 
 • चरबीयुक्‍त जेवण टाळावे 
 • दररोज एखादा खेळ खेळावा किंवा निदान तीस मिनिटे व्यायाम करावा 
 • आवळ्याचा समावेश दररोजच्या आहारात करावा. आवळ्यामुळे पचनशक्‍ती सुधारते आणि त्वचेतील शुष्कता कमी होते 
 • दररोज योग्य आणि पौष्टिक आहार घ्यावा. तोच चांगल्या प्रकृतीसाठी औषध आहे 
 • आहारात कडधान्ये, डाळी, भाज्या, फळे, गव्हाची कणीक यांचा समावेश असावा  
 • आठवड्यातील एक दिवस जेवणाऐवजी मोड आलेली कडधान्ये, फळे, भाज्या खा 
 • काकडी, टोमॅटो, मुळा अशा कच्चा भाज्या रोजच्या जेवणात असाव्यात 
 • पुरेशी विश्रांती घ्या 
 • पाणी भरपूर प्या  (पण फ्रिजमधील पाणी टाळा )
 • योगासनं, प्राणायाम करा  
 • एकाच वेळी भरपूर खाऊ नका, पोट गच्च होईल एवढे जेवू नका 
 • धूम्रपान करू नका 
 • कॉफी, शीतपेय, अल्कोहोल पिऊ नका 
 • दुपारी झोपू नका, रात्रीची जागरणे टाळा 
 • दिनचर्येत नियमितता ठेवा 
 • न्याहारी, दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची वेळ निश्‍चित असावी 
 • जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थ खावेत. उदा  कोल्ड्रिंक्‍स घेण्यापेक्षा लिंबू सरबत घ्या 
 • ऋतूनुसार आहार घ्यावा. त्या-त्या ऋतूमध्ये येणारी फळे खावीत  
 • गरजेपेक्षा जास्त खाणे नको. टीव्ही बघताना जेवणे, वाचन करीत खाणे घातक ठरते 
 • खूप मसालेदार, खारट पदार्थ टाळा, खूप गोड पदार्थ वर्ज्य करावेत  
 • कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी ठेवा. उदा. मटण, तळलेले मासे 
loading image
go to top