
महेंद्र गोखले - फिटनेसविषयक प्रशिक्षक
कोअर मसल्स म्हणजे पोट, कंबर, हिप्स स्नायूंचा एक गट आहेत जे हिप्सचे मसल, मणका, ओटीपोट किंवा ॲब्डोमेनच्या सभोवती असतात. स्पाईन, पेल्वीस आणि हालचाल करणारे आणि एकमेकांना जोडलेले असणारे हे स्नायू शरीर संतुलनासाठी आवश्यक असतात. शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागातील लोड ट्रान्सफरसाठी कोअर स्नायू आवश्यक आहेत. स्नायूंचे हे खोलवर असलेले थर आहेत जे आपल्या ओटीपोटाचा, मणक्याचे, हिप्सचे, पोटाचे, कंबरेच्या स्नायूंचे नियमन करतात. असे स्नायू आपल्या शरीराची रचना किंवा ठेवण कणखर आणि सरळ ठेवण्यास मदत करतात आणि आपल्या सगळ्या हालचाली जसे वळणे, वाकणे, उडी मारणे, हिंडणे, फिरणे नियंत्रित करतात.