esakal | धक्कादायक! कोरोनाचा स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या सेक्स लाईफवर होतो अधिक परिणाम

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! कोरोनाचा स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या सेक्स लाईफवर होतो अधिक परिणाम
धक्कादायक! कोरोनाचा स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या सेक्स लाईफवर होतो अधिक परिणाम
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अलिकडेच कोरोनासंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्या माहितीनुसार, पुरुष हे स्त्रियांपेक्षा अधिक प्रमाणात कोरोनाला बळी पडत आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असणं हे आहे. पुरुषांची प्रतिकारशक्ती कोरोनाशी सामना करण्यास सक्षम नाहीये आणि आता ही समस्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका गंभीर टप्प्यावर पोहोचली दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर, पुरुषांमधल्या या हार्मोन्सची कमतरता देखील मोठ्या संख्येने पुरुषांच्या मृत्यूला सध्या कारणीभूत ठरत आहे.

टेस्टोस्टेरॉन काय करतं?

तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली कशी काम करते आणि ती शरीरात येणाऱ्या विषाणूंशी कशी लढा देते, हे मुख्यत: पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन या हार्मोनवर अवलंबून असतं. टेस्टोस्टेरॉन हार्मोन आपल्या शरीरातील बहुतेक रोगप्रतिकारक प्रक्रियांमध्ये सामील असतं. यामध्ये एखाद्या व्हायरसविरोधात एँटीबॉडीज बनविण्यात मदत करण्याचं महत्त्वाचं काम देखील समाविष्ट असतं, जे मुख्यत: टेस्टोस्टेरॉनवरचं अवलंबून असतं.

हेही वाचा: काय आहे लाँग टर्म कोविड? कोरोनाच्या नव्या रुपाची लक्षणं माहिती आहेत का?

टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण आणि पुरुषांमध्ये त्याचं कार्य

टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन पुरुष आणि स्त्री या दोघांच्याही शरीरात उपलब्ध असतं. परंतु हे एक प्रामुख्याने पुरुषांमधील हार्मोन असून ते पुरुषांच्या लैंगिक जीवनावर नियंत्रण ठेवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. जर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी असेल तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रकारे काम करताना दिसत नाही. एका अभ्यासानुसार, स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण 60 टक्के तर पुरुषांमध्ये ते 68 टक्क्यांपेक्षा कमी असणं पुरेसं आहे.

याचं कारण असं आहे की, 68 टक्क्यांवर सुद्धा हे प्रमाण असणं पुरुषांमध्ये विषाणूंच्या विरोधात प्रतिसाद देऊ शकत नाही. तर स्त्रियांमध्ये ते 60 टक्क्यांवर असताना त्यांची प्रतिकार शक्ती योग्यप्रकारे काम करु शकते तसेच एखाद्या विषाणूविरोधात एँटीबॉडीज् निर्माण करण्याचं काम करु शकतं.

कोरोनाविरूद्धच्या लढाईत टेस्टोस्टेरॉनची आवश्यकता

कोरोना उद्रेक झाल्यापासून, या विषाणूवरील अभ्यास सतत चालू आहेत. याप्रकारच्या अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी ही गरजेपेक्षा कमी आहे. त्यांना कोरोनाचा विळखा बसत असताना त्यांचं शरीर मात्र कोरोना विरूद्ध हव्या त्या क्षमतेने लढू शकत नाहीये.