esakal | Video : तरुण व लहान मुलांवर होणार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम?

बोलून बातमी शोधा

Video : तरुण व लहान मुलांवर होणार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम?

Video : तरुण व लहान मुलांवर होणार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. पहिल्या दोन लाटा आल्यानंतर आता पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट मे अखेरपर्यंत ओसरणार आहे. मात्र, त्यानंतर लगेच तिसरी लाट येईल असं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या लाटेचा परिणाम तरुण व लहान मुलांवर अधिक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच कोरोनाची ही तिसरी लाट नेमकी कशी असेल व त्याची लक्षणे व त्यावरील उपाय काय हे डॉ. बिपीन जीभकाटे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट ही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त घातक असणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, योग्य ती काळजी घेतली तर या आजारावरही मात करता येऊ शकते.