esakal | Daily योग: कटिचक्रासन कसे करावे?
sakal

बोलून बातमी शोधा

katichakrasan

Daily योग: कटिचक्रासन कसे करावे?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

या आसनामुळे कंबरेला योग्य प्रमाणात ताण मिळतो आणि त्याची लवचिकता वाढते. हे आसन कसे करावे आणि त्याचे इतर फायदे कोणते ते जाणून घेऊयात..

कटिचक्रासन कसे करावे?

सावधान स्थितीत उभे रहावे. श्वास घेत दोन्ही हात सरळ पुढे, तळहात एकमेकांकडे करून जमिनीला समांतर करावे. दोन्ही तळहातांमध्ये खांद्याएवढे अंतर असणे आवश्यक आहे. श्वास सोडत कंबरेला पीळ देऊन हळुवार उजवीकडे वळा. उजव्या खांद्यावरून मागे पहा. हे करताना आपले पाय जमिनीवरून अजिबात हलू देऊ नका. त्यामुळे कंबरेला चांगला पीळ बसेल. तळहातातील अंतर एकसारखे राहू द्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर श्वास घेत समोर या आणि पुन्हा हिच क्रिया डाव्या बाजूला वळत करा.

कटिचक्रासनाचे फायदे कोणते?

- अपचन दूर होण्यास अत्यंत उपयुक्त असे हे आसन आहे.

- कंबर आणि मणक्याची लवचिकता वाढते.

- मान आणि खांद्याचे स्नायू मोकळे होतात. पोटातील आणि कंबरेचे स्नायू बळकट होतात.

- बैठे काम असणाऱ्यांसाठी हे आसन फायदेशीर आहे.

loading image