esakal | शोध स्वतःचा : कोविड रिकव्हरी आणि योग
sakal

बोलून बातमी शोधा

Devyani M

शोध स्वतःचा : कोविड रिकव्हरी आणि योग

sakal_logo
By
देवयानी एम.

मागील आठवड्यात आपण ‘लॉंग कोविड’ म्हणजे काय व त्याची कोणती लक्षणं आहेत, ती सविस्तर पाहिली. कोरोनाचा विषाणू आपल्या श्‍वसन संस्थेला आणि एकूणच आरोग्याला कसं पोखरत आहे, हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं आहेच किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना झालेला त्रासही पाहिला आहे. शक्य तितकी काळजी घेऊनही आपण त्यातून सुटू याची खात्री नाही, परंतु आपण आपली प्रतिकारशक्ती आणि आरोग्य तंदुरुस्त कसे ठेवू शकतो, जेणेकरून कोरोना झाला तरी त्यातून फार नुकसान होऊ न देता सुखरूप बाहेर येऊ; यावर पकड नक्कीच ठेवू शकतो. कोरोना झाल्यावरही त्याचे पडसाद आपल्या आयुष्याला व्यापून टाकत नाहीत ना, आपल्याला हैराण करून शारीरिक-मानसिक स्वास्थ्य हायजॅक करत नाहीत ना, यासाठी ‘सकाळ’ आणि ''योग ऊर्जा'' एकत्रित दोन महिन्यांचा ‘पोस्ट कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम’ सुरू करत आहेत. यात आम्ही योगातील विविध आसने आणि प्राणायामाच्या माध्यमातून तुमचं स्वास्थ्य पूर्ववत करायला मदत करणार आहोत.

गेल्या एक वर्षात कोविड झाला आहे का?

पोस्ट कोविड रिकव्हरी हे योगाच्या माध्यमातून करा, असं जगातील सर्व डॉक्टर्स सांगत आहेत. प्राणायाम हा रिकव्हरीसाठीचा मध्यवर्ती भाग आहे व त्या जोडीला काही ठराविक आसनं. परंतु, कोणती योगासने या काळात विशेष उपयोगी ठरणार आहेत, कोणते प्राणायाम निवडायचे, त्यात कसा बदल करायचा, त्यांची पातळी कशी वाढवत न्यायची, कोणत्या लक्षणांसाठी कोणते प्राणायाम व कशाप्रकारे केल्यानं गुण येणार आहे हे सांगायला व त्याप्रमाणं करवून घ्यायला योगातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं जरुरी आहे. तुमच्यातील कोविडच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊनच त्यानुसार हळूहळू प्रोग्रेसिव्हली नियोजन केलेली ही योग सत्रं असणार आहेत. पहिल्या आठवड्यापासून ते आठव्या आठवड्यापर्यंत टप्प्याटप्प्यानं दोन महिन्यांत तुमची क्षमता आम्ही वाढवत नेणार आहोत.

कोविड झाला नसेल तरीही...

मुळात योग ही एक जीवनशैली आहे. जसं झोप, जेवण इत्यादींसारख्या जीवनावश्यक गोष्टी आपण सातत्यानं करतोच, तसं योगातील शुद्धीक्रिया, आसनं, प्राणायाम व ध्यान हे जीवनावश्यक कॅटेगरीमध्ये येतात. विविध रोगांचा किंवा आरोग्याच्या तक्रारींचा शिरकाव होतो, तेव्हा आपणच आपल्या लाईफस्टाईलला डिसऑर्डरली, म्हणजे असंतुलित ठेवत असतो म्हणून ते होत असतात. आंतरिक ऑर्डरलीनेस किंवा समतोल योगाच्या साहाय्यानं साधला जाणार आहे. त्यामुळं कोरोना होवो अथवा न होवो, योगाला पर्याय नाही. खूप उशिरा याकडं वळण्यापेक्षा, त्रास होण्याची वाट न पाहता, सातत्यानं योग्य मार्गदर्शनाखाली योगाचा सराव केल्यास श्‍वसन, पचन, प्रजनन, रक्ताभिसरण, चयापचय, हार्मोन्स व मेंदूचे कार्य संतुलित राहते. शरीरातील विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर फेकली जातात, फुफ्फुसांच्या सर्व लोब्स, पुढील व मागील भाग या सर्वांना व्यायाम देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवायला विविध प्राणायाम मदत करतात.

माझ्याकडं कोरोनामधून बाहेर आलेले, पण स्टॅमिना कमी झालेले, अँगझायटी, नैराश्य, पॅल्पिटेशन, थकवा, निद्रानाश, श्वास घेण्यास त्रास होणारे, धाप लागणारे अनेक क्लायंट्स मी अशाच रिकव्हरीच्या माध्यमातून पूर्ण बरे झालेले पाहिले आहेत. कोविड झाला नसेल, तरी या निवडक योगासनं आणि प्राणायामांचा सराव केल्यानं शारीरिक आणि मानसिक कुरबुरींवर मात करता येईल. रोज ''सकाळ''च्या सर्व माध्यमांमध्ये या कार्यशाळेची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोतच. लवकरात लवकर नोंदणी करा आणि निरोगी राहण्यासाठीचे पहिले पाऊल उचला.

loading image