esakal | शोध स्वतःचा : एनर्जी मॅनेजमेंट
sakal

बोलून बातमी शोधा

Devyani-M

विद्यार्थिदशेतील मुला-मुलींपासून वर्किंग प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांना वीकएण्ड मनापासून आवडतोच. गुरुवारपासूनच चाहूल लागते आणि नुसता वीकएण्ड येतोय या विचारांनीच छान वाटू लागतं. या विचारात पुढचे दोन दिवस पटकन संपतात आणि मग... थँक गॉड इट्स फ्रायडे! किती तो आनंद!

शोध स्वतःचा : एनर्जी मॅनेजमेंट

sakal_logo
By
देवयानी एम.

विद्यार्थिदशेतील मुला-मुलींपासून वर्किंग प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांना वीकएण्ड मनापासून आवडतोच. गुरुवारपासूनच चाहूल लागते आणि नुसता वीकएण्ड येतोय या विचारांनीच छान वाटू लागतं. या विचारात पुढचे दोन दिवस पटकन संपतात आणि मग... थँक गॉड इट्स फ्रायडे! किती तो आनंद! साधारणपणे वीकएण्डला कुठेतरी फिरायला जाणे, सिनेमा किंवा वेबसीरिज बिंज वॉच करणे, उरलेली घरची कामे संपवणे, फॅमिली टाइम, पार्ट्या, खूप वेळ झोपणे किंवा ‘मी या वीकएण्डला काहीही करणार नाही,’ असे म्हणत रिलॅsssssक्स करणे.

हे सगळं आवश्यक आणि महत्त्वाचंही आहे. पण असं सगळं करूनही आपल्या मनात रविवारी रात्री धाकधूक आणि सोमवारी सकाळी खिन्नता का असते? वीकएण्ड कधी संपला कळलंच नाही, असं आपलं नेहमी होतं. इंग्रजीमध्ये ‘Don''t just exist.. Live’ म्हणतात तसं आपण अनेकदा प्रत्येक क्षण पूर्णपणे जगतच नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षण शंभर टक्के जगायला शिकल्यास वेळ कसा गेला हा प्रश्न पडणारच नाही. कारण वेळ हातातून न निसटता जगला जाईल. आपला वेळ आणि आयुष्य वीक-डे आणि वीकएण्ड अशा कप्प्यांमध्ये न विभागता वरील सर्व गोष्टी करूनही सोमवारची खिन्नता कशी येणार नाही हे पाहिलं पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुट्टीच्या दिवशी काय केल्याने कामाचा पहिला दिवस उमेदीने जाईल! सोमवारी मनाची टवटवी टिकवण्यासाठी वीकएण्डकडून खालील चार ‘R’ची पूर्तता व्हायला हवी. हे चार ‘R’ तुमच्या पुढील आठवड्याची सुरुवात सकारात्मकतेने आणि ऊर्जेने करतील.

Relaxation
विश्रांतीची गरज आपल्या सर्वांना आहे आणि त्याचं महत्त्व पटलेलेही असते, पण खऱ्या अर्थाने विश्रांती घेतली जात नाही. अनेकदा रिलॅक्सेशनच्या चुकीच्या कल्पना असतात. वीकएण्डला आराम करूनही सोमवारी फ्रेश वाटत नाही, कारण झोपण्या-उठण्याचं बिघडलेलं चक्र. आठवड्यातील इतर दिवसांपेक्षा झोपण्या-उठण्याच्या वेळांमध्ये खूप तफावत नको, दुपारची अती झोप टाळा, शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे विश्रांती मिळू दे; लोळणे आणि विश्रांती यात फरक समजा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Reflection 
सुट्टीमधील थोडा वेळ मागील आठवड्याचा आढावा आणि पुढील आठवड्याच्या नियोजनासाठी राखावा. आपल्यातील कौशल्य व ज्ञान यांच्यात काही विकास घडवून आणण्याची गरज आहे का? आपण कुठे आहोत? कुठे जायचेय? जे करतोय ते आणखी चांगल्या प्रकारे करू शकतो का? हे स्वतःला विचारा, स्वतःचेच मित्र बना आणि प्रगतीच्या दिशेने जाण्याचा मार्ग शोधत राहा. प्रश्न विचारत रहा!

Rejuvenation
पाणी न घातलेले झाड कोमेजते, तसे थकलेले मनही कोमेजते. त्याला ताजे करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागते. Change of work is rest हे आपण ऐकून आहोत. या धकाधकीमध्ये आपले छंद, कला, गुण जोपासणे आवश्यक आहे. पैसे कमवायला लागल्यावर ट्रेकिंग, सायकलिंग, नृत्य, वाचन, गायन, बाइकिंग, प्रवास, रोड ट्रिप्स हे सगळे मागे सुटते. टाइम मॅनेजमेंट आपल्याला बऱ्या‍पैकी जमते, पण जमत नाही एनर्जी मॅनेजमेंट. शारीरिक व मानसिक ऊर्जा उत्तम असल्यास काळ आणखी विस्तारतो. सुट्टीच्या दिवशी खूप वेळ टीव्ही किंवा वेब सिरीज पाहिल्यास थकवा, आळस आणि शरीरात मांद्य येते. जगातील सर्वांत यशस्वी लोक रिलॅक्सेशन आणि रिज्युव्हिनेशनवर भर देतात, कारण त्यांना एनर्जी मॅनेजमेंटचे गुपित माहीत असते, जे पुढील आठवड्याची कार्यक्षमता वाढण्यामागचे कारण ठरते.

Re-emphasize
काय करायचे, कधी करायचे, कसे करायचे या सगळ्यांमध्ये आपण जे करतोय ते ‘का’ करतोय ते  विसरायला होते. आपल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि ध्येयाच्या दिशेने आपण जात आहोत ना हे अधून-मधून खुंटा हलवून बळकट करून पाहावे लागते. आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे याचा विचार आणि आढावा घ्या. योग्य मार्गावरून न चालता भरकटत असाल तर परखडपणे त्याकडे पाहा आणि पुन्हा ध्येयाच्या दिशेने चाला.

तुमच्या कितीही आवडीचे काम असले, तरी एक वेळ येते जेव्हा तोचतोपणा येतो. वीकएण्डची एनर्जी मॅनेजमेंट सांभाळली तर रविवारी रात्री मनाची घालमेल न होता सोमवारी काय नवीन साध्य करायचेय या उमेदीत झोपी जाल. विचारांमध्ये अगदी रोड ब्लॉक आलाच तर पाचव्या ‘R’चा विचार करा - Reinvent!

Edited By - Prashant Patil